मातोश्री मंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.२४-: येथील मातोश्री कला क्रिडा मंडळातर्फे दि.२६ नोव्हेंबर ते दि. ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत दाभोली नाका-वेंगुर्ला येथे सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.२५) सायंकाळी दुर्गामातेचे सवाद्य मिरवणूकीने आगमन तर नवरात्रोत्सवा दरम्यान रोज सकाळी ९ वाजता दुर्गा मातेची नित्य पूजा, दुपारी १२ नैवेद्य आणि सायंकाळी ६.३० वाजता भजन आणि ७.३० वाजता महाआरती होणार आहे.

  दि. २६ सप्टेंबर रोजी रात्रौ ८ वाजता श्री विठ्ठल पंचायतन दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ला यांचा ‘कंदुकेश्वरी महिमा‘ हा पौराणिक नाट्यप्रयोग, दि.२७ रोजी रात्रौ  ८ वाजता खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचा दणकेबाज नाट्यप्रयोग, दि. २८ रोजी रात्रौ ८.०० वा. ‘फॅन्सीड्रेस स्पर्धा‘- वयोगट ५ ते ८ वर्षेमधील विजेत्यांना प्रथम क्र. ३०१/-, द्वितीय क्र. २५१/-, तृतीय क्र.२०१/-, उत्तेजनार्थ -१०१/-ची, वयोगट ९ ते १२ वर्षेमधील विजेत्यांना प्रथम क्र. ५०१/-, द्वितीय क्र. ३५१/-, तृतीय क्र.२५१/-, उत्तेजनार्थ -१५१/-ची दोन अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे. त्यानंतर फक्त मनोरंजनासाठी रेकॉर्ड डान्स होतील. दि. २९ रोजी रात्रौ ८ वाजता महिलांसाठी विशेष कार्यक्रम ‘खेळ पैठणीचा‘ आयोजित केला असून यातील प्रथम तीन विजेत्या महिलांना अनुक्रमे पैठणी, सोन्याची नथ, प्रेशर कुकर अशी बक्षिसे देण्यात येतील. दि.३० रोजी सायंकाळी ५ वाजता सामुहिक ‘महालक्ष्मीष्टक स्तोत्र व अन्नपूर्णा स्तोत्र‘ पठन, रात्रौ ८ वाजता निमंत्रित फुगडी मंडळांचा फुगडीचा महोत्सव, दि.१ ऑक्टोबर रोजी रात्रौ ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, दि.२ रोजी रात्रौ ८ वाजता निमंत्रित संघांचा दांडिया महोत्सव, दि.३ रोजी दुपारी ३ ते रात्रौ १० या वेळेत नवोदित संगित भजनी कलाकारांसाठी संगित भजन स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा फक्त तालुका मर्यादित असून प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५००१, ३००१, २००१ व इतर आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. दि. ४ रोजी सकाळी ९ वाजता श्रीसत्यनारायण महापूजा, तिर्थप्रसाद, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, रात्रौ ८ वाजता बक्षिस वितरण, रात्रौ ८.३० वाजता व्युव्ह फाऊंडर थिएटर्स निर्मित दोन अंकी ‘मेलस व्हरान‘ हे मालवणी नाटक होणार आहे. दि.५ रोजी सायंकाळी ४ वाजता महाआरती, त्यानंतर दाभोली नाका -पिराचा दर्गा-श्रीराम मंदिर मार्ग-गाडीअड्डा नाका-बाजारपेठ - जुने बस स्थानक ते मांडवी खाडी येथे मिरवणूकीने दुर्गामातेचे विसर्जन केले जाणार आहे.

  दुर्गा मातेच्या दर्शनाचा तसेच सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मातोश्री कला-क्रिडा मंडळातर्फे नवरात्रोत्सव समिती अध्यक्ष विलास गावडे व उपाध्यक्ष संदेश निकम यांनी केले आहे.
You cannot copy content of this page