Headlines

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे
अबिद नाईक यांनी गोवा येथे केले स्वागत

⚡कणकवली ता.३०-: राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खास.शरद पवार यांचा 1 ऑक्टोबर रोजी वेंगुर्ला येथे दौरा असून त्यांचे गोवा येथे हॉटेल ग्रँड हयात येथे त्यांचे आगमन झाले असता राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांच्यासमवेत राष्ट्रवादीमाजी कणकवली तालुका विलास गावकर,कणकवली तालुका राष्ट्रवादी निरीक्षक सावळाराम…

Read More

विजेचा शॉक लागल्याने माकड गंभीर

मनसेच्या शुभम सावंत यांनी पशू दवाखान्यात दाखल करीत केले उपचार ⚡सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडी बस स्थानक परिसरात माकडाला विजेचा जोरदार धक्का बसल्याने माकड गंभीर जख्मी झाले होते. ही बाब मनसे उपशहर अध्यक्ष शुभम सावंत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ त्या माकडाला पशू सवर्धन केंद्रात दाखल करत जीवनदान दिले आहे. यावेळी त्यांच्यासोबत अक्षय सुतार, विक्रांत गावडे होते….

Read More

फळे फळभाज्या व भाज्या पासून सॅलॅड डेकोरेशन स्पर्धेत कुडाळच्या श्रुती सावंत प्रथम

⚡वेंगुर्ले ता.३०-: जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटक व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग अंतर्गत वेंगुर्ले पर्यटन तालुका महिला समिती व अन्य संस्थातर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय फळे, फळभाज्या व भाज्या यांच्यापासून सॅलड डेकोरेशन स्पर्धेत कुडाळच्या श्रुती सावंत प्रथम क्रमांक पटकावला.येथील साई दरबार हॉलमध्ये जागतिक पर्यटन दिनाच्या औचित्य साधून पर्यटक व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग अंतर्गत लिनेस क्लब, एम.टी.डी.सी., माझा वेंगुर्ला,…

Read More

मडुरा पंचक्रोशीतील शाळा भरणा-सुटण्याच्यावेळी पोलिस गस्त ठेवा

भाजपचे यशवंत माधव यांची मागणी : ग्रामपंचायत प्रशासनानेही दखल घ्यावी ⚡बांदा ता.३०-: बांदा परिसरात मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणारी घटना घडल्यामुळे मडुरा पंचक्रोशीतील शाळांची भरण्याची वेळ व सुटण्याच्या वेळी निदान अर्धा तास पंचक्रोशीत पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी, भाजपा सातार्डा शक्ती केंद्रप्रमुख यशवंत माधव यांनी केली आहे. तसेच ग्रामपंचायत प्रशासनानेही दखल घ्यावी असेही ते म्हणाले….

Read More

ऑल आऊट मिशनमुळे अनेकांची तारांबळ

सावंतवाडी पोलिसांची अचानक मोहीम;धुमस्टाईल बाईक स्वारांसाठी राबविली मोहीम ⚡सावंतवाडी ता.३०-: शहरात धुमस्टाईल बाईक चालवणाऱ्याना रोखण्यासाठी सावंतवाडी पोलिसांकडून शहरात आज अचानक मिशन ऑल आऊट मोहीम राबविण्यात आली असून, यावेळी कागदपत्रे व लायसन शिवाय गाड्या चालवणाऱ्याना पोलिसांकडून दणका देण्यात आला. अचानक राबविलेल्या या मोहिमेमुळे अनेकांची तारांबळ उडाली होती.

Read More

पाडलोस-माडाचेगावळमध्ये फेरीवाले, अनोळखी व्यक्तींना मनाई

⚡बांदा ता.३०-: मडुरा पंचक्रोशीत फिरणारे अनोळखी व्यक्ती किंवा फेरीवाल्यांकडून अनेकदा चोरीचे प्रकार घडले. तसेच सद्यस्थितीत मुले पळविणारी टोळी सावंतवाडी तालुक्यात फिरत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाडलोस माडाचेगावळ येथील ग्रामस्थांनी वाडीतील रस्त्यावर अनोळखी व्यक्ती अथवा फेरीवाल्यांना सक्त मनाई केली आहे तसेच कुणीही संशयास्पद फिरताना आढळून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा फलकच लावल्याने ग्रामस्थांची सतर्कता…

Read More

सात्विक आहारानेच बालकांचा गुणात्मक विकास – मनीषा गोवेकर

⚡सावंतवाडी ता.३०: मुलांना बालवयात योग्य व सात्विक आहार मिळाल्यास त्यांची शारीरिक व मानसिक जडणघडण योग्य रीतीने होऊन गुणवत्तापूर्ण विकास होतो, असे प्रतिपादन सावंतवाडी पंचायत समितीच्या माजी सदस्य मनीषा गोवेकर यांनी धाकोरा येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.पोषण आहार अभियानांतर्गंत राज्यभर सुरू असलेला कार्यकम अंगणवाडी धाकोरा येथे पार पडला. यात ६ महीने ते ३ वर्षे तसेच ४…

Read More

चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण करण्याचा डाव शाळकरी मुलाने हाणून पाडला

वाफोली येथील प्रकार;अपहरण करणाऱ्यांच्या हाताला चावा घेत केली सुटका बांदा /प्रतिनिधीबांदा शहरातील निमजगा प्राथमिक शाळेच्या तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वाफोली रस्त्यावर दुचाकीने आलेल्या दोन इसमानी चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाने प्रसंगवधान दाखवत मुलाने संशयितच्या हाताचा चावा घेऊन आपली सोडवणूक केली. सकाळी साडेदहा वाजता भर वस्तीत हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली…

Read More

रॉयल्टी रद्द करण्यासाठी डंपर व्यावसायिक देवेंद्र फडणवीस यांची घेणार भेट

गोवा सरकारने महाराष्ट्रातील खनिज वाहतुकीवर सुरू केली आहे रॉयल्टी बांदामहाराष्ट्रातून गोव्यात होणार्‍या खनिज वाहतुकीवर पाचशे रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत रॉयल्टी आकारण्याची प्रक्रिया गोवा सरकारकडून शुक्रवार 23 पासून सुरु केली. या निर्णयाचा महाराष्ट्र मधून गोव्यात वाहतूक करणाऱ्या डंपर व्यावसायिकांना फटका बसला आहे. याबाबत गोवा येथील डंपर व्यावसायिकांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची भेट घेतली मात्र…

Read More

१ ऑक्टोबर रोजी वेंगुर्ले येथे बँ नाथ पै जन्मशताब्दी महोत्सव

नागरिकांना उपस्थित राहण्याचे अदिती पै यांचे आवाहन वेंगुर्ले      बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट मुंबई, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग कुडाळ व व्हिक्टर डांट्स लॉ कॉलेज कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार एक ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते १२.३० वा. वेंगुर्ले मधुसूदन कालेलकर सभागृह येथे बॅरिस्टर नाथ पै  जन्मशताब्दी सोहळा आयोजित करण्यात…

Read More
You cannot copy content of this page