विजेचा शॉक लागल्याने माकड गंभीर

मनसेच्या शुभम सावंत यांनी पशू दवाखान्यात दाखल करीत केले उपचार

⚡सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडी बस स्थानक परिसरात माकडाला विजेचा जोरदार धक्का बसल्याने माकड गंभीर जख्मी झाले होते. ही बाब मनसे उपशहर अध्यक्ष शुभम सावंत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ त्या माकडाला पशू सवर्धन केंद्रात दाखल करत जीवनदान दिले आहे.

यावेळी त्यांच्यासोबत अक्षय सुतार, विक्रांत गावडे होते. यावेळी त्या माकडावर उपचार केल्यानंतर त्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. यावेळी वनविभागाचे अधिकारी पशू संवर्धन केंद्रात दाखल झाले होते.

You cannot copy content of this page