फळे फळभाज्या व भाज्या पासून सॅलॅड डेकोरेशन स्पर्धेत कुडाळच्या श्रुती सावंत प्रथम

⚡वेंगुर्ले ता.३०-: जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटक व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग अंतर्गत वेंगुर्ले पर्यटन तालुका महिला समिती व अन्य संस्थातर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय फळे, फळभाज्या व भाज्या यांच्यापासून सॅलड डेकोरेशन स्पर्धेत कुडाळच्या श्रुती सावंत प्रथम क्रमांक पटकावला.
येथील साई दरबार हॉलमध्ये जागतिक पर्यटन दिनाच्या औचित्य साधून पर्यटक व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग अंतर्गत लिनेस क्लब, एम.टी.डी.सी., माझा वेंगुर्ला, रोटरी क्लब, वेताळ प्रतिष्ठान, तुळस, साहस प्रतिष्ठान, वेंगुर्ला व पर्यटन व्यावसायिक महासंघ शाखा, वेंगुर्ले
यांच्यातर्फे आयोजित केलेल्या ‘जिल्हास्तरीय फळे, फळभाज्या व भाज्या पासून सॅलॅड डेकोरेशन’ स्पर्धेत जिल्ह्यातील 17 महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षण हाॅटेल व्यावसायिक संग्राम सावंत व अशोक धुरी यांनी केले. फळे, फळभाज्या व भाज्या या पासून बनविलेल्या सॅलॅड डेकोरेशन स्पर्धेत काकडी पासून बाहुली, कारल्यापासून मगर, बेडूक, पडवळापासून साप, खोबरे व अफूच्या मुंडल्यापासून कासव, याबरोबरच प्राणी खाद्यपदार्थ अशा विविध प्रकारच्या सॅलॅडचे आकर्षक डेकोरेशन करण्यात आले होते.
या स्पर्धेत द्वितीय क्रमांक श्वेता अखिल आरोसकर (वेंगुर्ले), तृतीय क्रमांक जान्हवी सावंत (कुडाळ), चतुर्थ क्रमांक बिना प्रदीप भाटिया (वेंगुर्ले), तर पाचवा क्रमांक योगिता तांबे (कुडाळ) यांनी पटकावला.
जिल्हास्तरीय फळे, फळभाज्या व भाज्या यांपासून सॅलड डेकोरेशन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रुपये 2000, 1500, 1000, 750 व 500 ची रोख रक्कमेचा पारितोषिकांचे तसेच सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रकांचे वितरण अँड. सुषमा प्रभू-खानोलकर, प्राची मणचेकर यासह मान्यवरांचे हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रांचे वितरण झाले. यावेळी लिनेस क्लबच्या निला यरनाळकर, हेमा गावस्कर, प्राची मणचेकर, दिशा कर्पे, रसिका मठकर, प्रार्थना हळदणकर, रोटरीच्या वृंदा गवंडळकर, माजी सभापती स्मिता दामले, माजी उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, माजी नगरसेविका कृपा गिरप-मोंडकर, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर यांचा समावेश होता.

You cannot copy content of this page