Headlines

सिमेंट वाहतूक करणारा ट्रक
पलटी झाल्याने नुकसान

⚡कणकवली ता.०४-: फोंडाघाटाच्या पायथ्यापासून काही अंतरावर,पिंपळवाडी येथील एका वळणावर, अवजड ट्रकचा पुढील व्हील एक्सल तुटल्याने आणि टर्न न बसल्याने, लगतच्या शेतात उलटल्याने सकाळी 9 च्या सुमारास अपघात झाला. ट्रकमध्ये सिमेंट भरलेले असून, तो कोल्हापूरहून कणकवलीमार्गे गोव्याकडे जात होता. ट्रकचे अतोनात नुकसान झाले आहे. ट्रक पलटी झाल्यावर सिमेंटच्या बॅगा लगतच्या शेतात विखुरल्या असून, टाकीतून डिझेल वाहत…

Read More

ओसरगावच्या विकासकामांना निधी द्यावा

माजी उपसरपंच बबली राणे यांची नाम.दादा भुसे यांच्याकडे मागणी ⚡कणकवली ता.०४-: कणकवली तालुक्यातील ओसरगाव हे इको सेन्सिटिव्ह झोनममध्ये गाव आहे. त्यामुळे गावातील विकासकामांना खीळ बसली असून थेट खनिकर्म विभागाकडून ओसरगाव च्या विविध विकासमांसाठी निधी द्यावा अशी मागणी ओसरगाव माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांनी पर्यावरण तथा खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. मंत्री दादा…

Read More

हळवल फाट्यावरील अनधिकृत स्टॉल हटवा

हळवल भाजपाचे प्रशासनाला निवेदन ; धरणे आंदोलनाचा इशारा ⚡कणकवली ता.०४-: मुंबई – गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे मागील काही महिन्यांपासून अपघातांचे सत्र सुरूच आहेत. आज पर्यंत साधारण त्याठिकाणी पाच ते सहा अपघात झाले.हळवल फाट्यावरील अनधिकृत स्टॉल हटविण्यात यावेतअन्यथा भाजपच्यावतीने आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा हळवळ येथील भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये काहींनी…

Read More

फोंडाघाट जुना बाजार येथील
विनायक सावंत यांचे निधन

⚡कणकवली ता.०४-: कणकवली तालक्यातील फोंडाघाट जुना बाजार येथील चतुरस्त्र व्यक्तिमत्व, नागरीक विनायक सूर्यकांत सावंत (४० वर्ष ) यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मित्रपरिवार आणि सामाजिक कार्यात त्यांचा वावर उठावदार होता. पप्या या नावाने ते परिचित होते.काही काळ त्यांनी पत्रकारितेमध्ये काम पाहिले होते. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगी, आई, भाऊ- बहीण असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मित…

Read More

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत नानल, सावंत, राऊळ यांची बाजी

देवगड-प्रतिनिधीकै.अथर्व अशोक दिक्षित चषक कै. नीलकंठ श्रीधर दीक्षित यांचे पुण्यस्मरणार्थ जामसंडे सन्मित्र मंडळ,जामसंडे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेमध्ये खुल्या गटातून शुश्रुत नानल (कणकवली) तर ९ वर्षाखालील गटामधून यश सावंत (सावंतवाडी),१४ वर्षाखालील भावेश कुडतडकर (सावंतवाडी),१७ वर्षाखालील मिहीर सकपाळ (देवगड)यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे खुला गट द्वितीय बाळकृष्ण पेडणेकर (सावंतवाडी)तृतीय वरद पाटील…

Read More

संविता आश्रमचा नवव्या वर्धापनदिनी लायन्स क्लब बांदा कडून वस्तू दान

बांदा/प्रतिनिधीमहात्मा गाधी जयंती आणि संविता आश्रम पणदूर-अणाव च्या नवव्या वर्धापनदिना निमित लायन्स कलब ऑफ बांदाच्या वतीने जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.यावेळी क्लबचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर म्हणाले, आज समाज व्यवस्था बदलली आहे. निराधार व्यक्तिना आधार देवून त्यांची निस्वार्थी हेतूने काम करणारे संदिप परब आणि त्यांचे सहकारी यांचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे. आपण ज्यावेळी हाक माराल त्यावेळी…

Read More

उल्हास देसाई यांची सिंधुदुर्ग जिल्हा मित्र मंडळ डोंबिवलीच्या कार्यकारिणीवर निवड

बांदा/प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंबिवली येथे गेली ३५ वर्षे कार्यरत असलेल्या ‘सिंधुदुर्ग जिल्हा मित्र मंडळ’ डोंबिवलीच्या कार्यकारी मंडळावर डेगवे गावचे सुपुत्र तथा डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस उल्हास बाबाजी देसाई यांची बहुमताने मंडळाच्या कार्यकारीणीवर निवड करण्यात आली आहे.सदर निवड मार्च २०२४ पर्यंत आहे. या निवडीमुळे डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार गुरूनाथ देसाई यांनी तसेच…

Read More

चांदणझुला कवी संमेलन

⚡वेंगुर्ला ता.०४-: कोजागिरीचे औचित्य साधून आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे ८ ऑक्टोबर रोजी साई दरबार हॉल येथे दुपारी ३.३० वाजता ‘चांदणझुला‘ कवी संमेलन आयोजित केले आहे.

Read More

विविध स्पर्धेत अणसूरपाल हायस्कूलचे यश

⚡वेंगुर्ला ता.०४-: ‘स्वच्छता हिच सेवा‘ या तालुकास्तरीय उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांमध्ये अणसूरपाल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. यात चित्रकला व घोषवाक्य स्पर्धेत दिक्षा राजन पालकर हिने अनुक्रमे प्रथम व द्वितीय तर निबंध स्पर्धेत शिवांगी संजय अणसूरकर हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Read More

मुलांना शालेय वस्तूंचे वाटप

⚡वेंगुर्ला ता.०४-: सेवा पंधरवडाचे औचित्य साधून वेंगुर्ला भाजपातर्फे जीवन शिक्षण शाळा खानोली नं.१ व खानोली नं.२ या शाळांमधील मुलांना भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्यातर्फे शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

Read More
You cannot copy content of this page