⚡सावंतवाडी ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षीप्रमाणे प्रज्ञा परीक्षेमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली. सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळ द्वारा आयोजित प्रज्ञा परीक्षा 2026 मध्ये इयत्ता पाचवीतून कु.यश प्रवीण सावंत व इयत्ता आठवीतून कु. करिष्मा पंकज मांजरेकर यांनी प्रज्ञा परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश संपादित केले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या शिक्षिका श्रीम. प्रेरणा भोसले व श्रीम. फरजाना मुल्ला यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले.
मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे प्रज्ञा परीक्षेत उत्तुंग यश…
