शिवसेना सावंतवाडी तालुका व दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचा उपक्रम; संजू परब यांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन..
⚡सावंतवाडी ता.२९-: शिवसेना सावंतवाडी तालुका आयोजित व माजी आमदार दीपक केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत सावंतवाडी तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मंगळवार दि. ३० जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
हा सोहळा सायंकाळी ४ वाजता सावंतवाडी शहरातील काझी शहाबुद्धीन हॉल, एस.टी. स्टँडसमोर येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले आहे.
