कोकणातील एकता पॅनल सदस्य घेणार शपथ..
कुडाळ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चरची २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी नुकतीच निवडणूक संपन्न झाली. नवनिर्वाचित कार्यकारीणी सदस्य व पदाधिकाऱ्यांचा शपथग्रहण सोहळा शनिवार दिनांक ४ जुलै रोजी सायंकाळी चार वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे होणार असून या शपथग्रहण समारंभासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलशक्ती मंत्री सि.आर.पाटील, उपमुखमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सौ.सुनेञा पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, उद्योगमंत्री उदय सामंत आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या निवडणुकीत निवडून आलेले एकता पॅनेलचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष राणे,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य अँड.अँड.नकुल पार्सॅकर, राजन नाईक, मनोज वालावलकर, विजय केनवडेकर, मिलिंद प्रभू, कुणाल ओरसकर हे उपस्थित राहाणार आहेत. यावेळी कोकणातील उद्योजकांच्या अनेक प्रलंबित मागण्या आणि उद्योग वाढीसाठी आवश्यक भौतिक सुविधा याबाबत मसिआच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यां सोबत विचारविनिमय होणार आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चरच्या या ऐतिहासिक शपथग्रहण सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन चेंबरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे व ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिश पेडणेकर यानी केले आहे.
