हळवल फाट्यावरील अनधिकृत स्टॉल हटवा

हळवल भाजपाचे प्रशासनाला निवेदन ; धरणे आंदोलनाचा इशारा

⚡कणकवली ता.०४-: मुंबई – गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे मागील काही महिन्यांपासून अपघातांचे सत्र सुरूच आहेत. आज पर्यंत साधारण त्याठिकाणी पाच ते सहा अपघात झाले.हळवल फाट्यावरील अनधिकृत स्टॉल हटविण्यात यावेत
अन्यथा भाजपच्यावतीने आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा हळवळ येथील भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे.

त्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये काहींनी आपले प्राणही गमावले आहे. मात्र एकंदरीत घटना पाहता तेथे झालेले अपघात हे रात्रीचे झाले त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळलेली आहे.
हळवल येथील भाजप कार्यकर्ते शशिकांत राणे, भाजपा कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, प्रदीप गावडे, सुदर्शन राणे, श्यामसुंदर दळवी, शिवा राणे, वामन परब, उमेश घाडीगावकर, पूजा घाडीगांवकर, गणेश गावडे, समर्थ राणे आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

हळवल फाटा याठिकाणी असलेल्या स्टॉल वर गिऱ्हाईकांची मोठी ये – जा असते. असे असताना त्या ठिकाणी जर दिवसा अपघात झाले असते तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु सुरुवातीला झालेल्या अपघाता वेळी तेथील स्टॉल धारकांना प्रशासन यंत्रणेकडून स्टॉल हटविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. परंतु त्या ठिकाणच्या स्टॉल धारकांनी त्या सूचनांचे पालन केले नाही. मात्र हळवल फाट्यावरील ते वळण धोकादायक असल्याचे लक्षात घेत उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली, कणकवली पोलीस निरीक्षक, तहसीलदार कणकवली , प्रांताधिकारी कणकवली यांना निवेदन दिले आहे.
प्रसंगी,जनतेच्या हितासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

You cannot copy content of this page