ओसरगावच्या विकासकामांना निधी द्यावा

माजी उपसरपंच बबली राणे यांची नाम.दादा भुसे यांच्याकडे मागणी

⚡कणकवली ता.०४-: कणकवली तालुक्यातील ओसरगाव हे इको सेन्सिटिव्ह झोनममध्ये गाव आहे. त्यामुळे गावातील विकासकामांना खीळ बसली असून थेट खनिकर्म विभागाकडून ओसरगाव च्या विविध विकासमांसाठी निधी द्यावा अशी मागणी ओसरगाव माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांनी पर्यावरण तथा खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली.

मंत्री दादा भुसेंची बबली राणे यांनी मुंबईत मंत्रालयात भेट घेतली. यावेळी मंत्री भुसेंकडे ओसरगावातील मळीवाडी सडेवाडी असरोंडी रस्त्याच्या डांबरीकरण व मजबुतीकरणसाठी खनिकर्म विभागाकडून निधी देण्याची मागणीही बबली राणे यांनी मंत्री भुसेंकडे केली.

You cannot copy content of this page