बांदा/प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंबिवली येथे गेली ३५ वर्षे कार्यरत असलेल्या ‘सिंधुदुर्ग जिल्हा मित्र मंडळ’ डोंबिवलीच्या कार्यकारी मंडळावर डेगवे गावचे सुपुत्र तथा डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस उल्हास बाबाजी देसाई यांची बहुमताने मंडळाच्या कार्यकारीणीवर निवड करण्यात आली आहे.
सदर निवड मार्च २०२४ पर्यंत आहे. या निवडीमुळे डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार गुरूनाथ देसाई यांनी तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हा मित्र मंडळाचे अध्यक्ष राजीव अंधारी, उपाध्यक्ष गोविंद म्हाडगुत व सचिव ज्ञानेश्वर सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
उल्हास देसाई हे सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावातील असून त्यांना सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याची आवड आहे. त्यामुळे मुंबईत आल्यावर त्यांनी सर्व प्रथम ते रहात असलेल्या आपल्या मुंबईस्थित वाडीतील तरुणांना एकत्र करुन ४० वर्षापूर्वी डेगवे-आंबेखणवाडी युवक मंडळ, मुंबईची स्थापना करून त्या माध्यमातून सामाजिक कार्यास प्रारंभ केला. मंडळाच्या स्थापनेपासून सरचिटणीस पदाची धुरा ते यशस्वीपणे सांभाळत आहेत.
डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे गेली कित्येक वर्षे कार्यकारीणी सदस्य, सहचिटणीस या पदावर काम करीत आहेत.
डेगवे गावातील नंदादीप”वाचनालयाचे ते संस्थापक सदस्य असून त्या वाचनालयाच्या सहकार्यवाह व कार्यवाह पदावर काम केले आहे. त्यांच्या निवडीमुळे डेगवे पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
फोटो :-
उल्हास देसाई.
उल्हास देसाई यांची सिंधुदुर्ग जिल्हा मित्र मंडळ डोंबिवलीच्या कार्यकारिणीवर निवड
