बांदा/प्रतिनिधी
महात्मा गाधी जयंती आणि संविता आश्रम पणदूर-अणाव च्या नवव्या वर्धापनदिना निमित लायन्स कलब ऑफ बांदाच्या वतीने जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.
यावेळी क्लबचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर म्हणाले, आज समाज व्यवस्था बदलली आहे. निराधार व्यक्तिना आधार देवून त्यांची निस्वार्थी हेतूने काम करणारे संदिप परब आणि त्यांचे सहकारी यांचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे. आपण ज्यावेळी हाक माराल त्यावेळी बांदा लायन्स कलबचे मेंबर्स आपल्या कार्यात सहभागी होतील. यावेळी बांदा माजी सरपंच दिपक सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले. संदीप परब म्हणाले, बांदा कलबने वंचित समाजासाठी काम करून आज संविता आश्रमच्या वर्धापनदिना निमित केलेले सहकार्य मोलाचे आहे.
यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, सचिव समिर कोलते, खजिनदार नाना सावंत, मधुकर देसाई, निगुडे माजी सरपंच आत्माराम गावडे, गितांजली पेडणेकर, रुपेश शेवडे, संदिप परब आदी उपस्थित होते.
फोटो :-
पणदूर-अणाव येथे जीवनावश्यक वस्तू देताना बांदा लायन्स क्लबचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर. सोबत पदाधिकारी.
संविता आश्रमचा नवव्या वर्धापनदिनी लायन्स क्लब बांदा कडून वस्तू दान
