चांदणझुला कवी संमेलन

⚡वेंगुर्ला ता.०४-: कोजागिरीचे औचित्य साधून आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे ८ ऑक्टोबर रोजी साई दरबार हॉल येथे दुपारी ३.३० वाजता ‘चांदणझुला‘ कवी संमेलन आयोजित केले आहे.

  कवीवर्य विठ्ठल कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या संमेलनात वेंगुर्ला तालुक्यातील कवींनी आपली स्वरचित एक कविता सादर करावयाची आहे. तरी रसिकांनी यावेळी उपस्थित राहून नवोदित कवींच्या कविता ऐकाव्यात व त्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आनंदयात्रीच्या संयोजक वृंदा कांबळी, प्रा. सचिन परुळकर, संजय पाटील व महेश राऊळ यांनी केले आहे.
You cannot copy content of this page