Headlines

मुसळधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत

तर ग्रामीण भागातील भातशेती पाण्याखाली ⚡बांदा ता.१६-: आज सायंकाळी बांदा शहर व परिसराला मुसळधार परतीच्या पावसाने झोडपून काढले. विजांच्या गडगडाटासह ढगफुटीसदृश्य कोसळलेल्या पावसाने शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. मुसळधार पडलेल्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले तर ग्रामीण भागात भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.आज दुपारी ३ वाजता…

Read More

हरकुळ खुर्द खालची तेलीवाडीच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य

ग्रामस्थांनी घेतली आम. नितेश राणेंची भेट ⚡कणकवली ता.१६-: हरकुळ खुर्द खालची तेलीवाडी येथील विकास कामे वारंवार मागणी व पाठपुरावा करून देखील दुर्लक्षित राहिलेली आहेत. हरकुळ खुर्द व्हावटवाडी, मासयेवाडी, खालची तेलीवाडी पंतप्रधान सडक रस्ता ते खालीची तेलीवाडी जि.प. शाळा रस्ता तयार करणे, हरकुळ खुर्द खालची तेलीवाडी येथे पाण्याची विहीर बांधणे, हरकुळखुर्द खालची तेलीवाडी मध्ये स्ट्रीट साईट…

Read More

बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या त्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

वेंगुर्ला बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे उप जिल्हाप्रमुख सचिन देसाई ,सुनील डुबळे व बाळा दळवी यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर त्यांचे वेंगुर्ले येथे बाळासाहेबांचे शिवसेना वेंगुर्ला शिवसेना शाखेत त्यांचे शाल श्रीफळ घालून स्वागत करण्यात आले यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख सचिन वालावलकर ,उप…

Read More

शेर्लेत विनापरवाना वाळू उत्खनन विरोधात कारवाई

केवळ अर्धा ब्रास रेती, एक फावडे व एक बुट्टी जप्त : तेरेखोल नदीपात्रात रेती उत्खनन ⚡बांदा ता.१६-: तेरेखोल नदीपात्रात शेर्ले येथे विनापरवाना वाळू उत्खनन विरोधात महसूल विभागाने कडक मोहीम घेतली. शनिवारी सायंकाळी महसूल विभागाच्या पथकाने नदीपात्रात जाऊन धाड टाकली मात्र ही धाड म्हणजे वराती मागून घोडे असल्याचे उघड झाले आहे. कारण या कारवाईत केवळ अर्धा…

Read More

सिंधुदुर्ग महाराष्ट्रासाठी शैक्षणिक विकासाचे मॉडेल बनवणार- दीपक केसरकर

⚡वेंगुर्ला ता.१६-: दिल्ली, गोवा, राजस्थान ही राज्ये शिक्षण क्षेत्रात अव्वल आहेत. या राज्यांच्या बरोबरीने महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचप्रमाणे शिक्षणाच्या सर्व सोयीसुविधा मिळाव्यात या दृष्टिकोनातून शाळा पाहणी या संदर्भातील आढावा संस्थाचालक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विद्यार्थी यांच्याकडून घेतला गेला असून सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्यासाठी एक शैक्षणिक मॉडेल बनवण्याचा आपला संकल्प आहे. त्यासाठी आपण राज्याच्या शिक्षण सचिवांची टीम सिधुदुर्गात…

Read More

राजकीय परिस्थितीनुसार घेणार युतीचा निर्णय

भाजप नेते केंद्रीयमंत्री राणे यांनी केले स्पष्ट;परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देणार ⚡सावंतवाडी ता.१६-: परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकर मिळून दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणें यांनी आज येथे दिली. दरम्यान आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये सोयीच्या ठिकाणी होणारी युती त्या वेळच्या राजकीय परिस्थितीनुसार घेणार असल्याचेही राणे यांनी…

Read More

बांदा खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

ग्रंथ प्रदर्शन आणि ग्रंथ समीक्षण स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग ⚡बांदा ता.१६-: लोकांचे राष्ट्रतीपती अशी ओळख असणाऱ्या भारताचे लाडके नेतृत्व भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस जगभरात विदयार्थी दिवस म्हणून आणि सोबतच महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. विविध कार्यक्रमांचे आयोजन करून डॉ कलाम यांना जगभरातून आदरांजली वाहिली जाते. खेमराज मेमोरियल इंग्लिश…

Read More

सावंतवाडी-लाखे वस्ती येथील मोफत रक्त तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

२०० हून अधिक व्यक्तींची मोफत तपासणी ⚡सावंतवाडी ता.१६-: कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्पा अंतर्गत आज सावंतवाडी लाखे वस्तीमध्ये घेण्यात आलेल्या मोफत रक्त तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २०० हून अधिक व्यक्तींची मोफत तपासणी या शिबिराच्या मार्फत करण्यात आली. या शिबिराबरोबरच थायरॉईड हिमोग्लोबिन ,CBC,HCV,HIV,STI आदी रक्ततपासणी करण्यात आली. जवळपासया कार्यक्रमाचे नियोजन…

Read More

श्रद्धा सावंत-राणे यांचा उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने सेवानिवृत्तीपर सत्कार

⚡सावंतवाडी ता.१६सहदेव राऊळ-: मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या माजी मुख्याध्यापिका सौ श्रद्धा सावंत-राणे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने वाचनालयाचे संचालक तथा मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचे माजी मुख्याध्यापक बाळकृष्ण मुळीक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्काराबद्दल सावंत-राणे मॅडम यांनी वाचनालयाचे आभार व्यक्त केले. त्यांनी वाचनालायाला आर्थिक स्वरूपाची मदतही केली….

Read More

मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांच्या कुटुंबाचे माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देत केले सांत्वन

सावंतवाडी : मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांच्या निवासस्थानी माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देत त्यांचे सांत्वन केले. काही दिवसांपूर्वी मराठे यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले होते. त्या पार्श्वभूमीवर राणे यांनी भेट देत त्त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक बाबा परब प्रितेश राऊळ आदी उपस्थित होते

Read More
You cannot copy content of this page