सावंतवाडी-लाखे वस्ती येथील मोफत रक्त तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

२०० हून अधिक व्यक्तींची मोफत तपासणी

⚡सावंतवाडी ता.१६-: कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्पा अंतर्गत आज सावंतवाडी लाखे वस्तीमध्ये घेण्यात आलेल्या मोफत रक्त तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २०० हून अधिक व्यक्तींची मोफत तपासणी या शिबिराच्या मार्फत करण्यात आली.

या शिबिराबरोबरच थायरॉईड हिमोग्लोबिन ,CBC,HCV,HIV,STI आदी रक्ततपासणी करण्यात आली. जवळपास
या कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन रासाई कला क्रीडा मंडळ लाखे वस्ती सावंतवाडी या मंडळाचे अध्यक्ष दीपक लाखे व उपाध्यक्ष विकी लाखे तसेच मंडळाचे कार्यकर्ते कृष्णा लाखे, अमित लाखे, गणेश खोरागडे, लखन पाटील, रोहित लाखे व सुभाष लाखे यांनी केले. या आरोग्य शिबिराला लाखे वस्तीतील महिला, पुरुष व लहान मुले यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोकण कला व शिक्षण विकास संस्था माणगाव सिंधुदुर्ग या संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्री अजिंक्य शिंदे, डॉ. अनुष्का सावंत , सुनील सोनसुरकर , श्री समीर शिर्के (समुपदेशन), सौ अवंती धुरी, श्री कुणाल चव्हाण ,श्री प्रदीप पवार ,जयराम जाधव व हिंद लॅब च्या वतीने श्वेता वराडकर व वैभवी बांदेकर यांनी ही सेवा दिली. याप्रसंगी याप्रसंगी जेष्ठ पत्रकार मोहन जाधव प्रेरणाभूमीचे अध्यक्ष दीपक पडेलकर सर व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव उपस्थित होते.

You cannot copy content of this page