श्रद्धा सावंत-राणे यांचा उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने सेवानिवृत्तीपर सत्कार

⚡सावंतवाडी ता.१६सहदेव राऊळ-: मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या माजी मुख्याध्यापिका सौ श्रद्धा सावंत-राणे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने वाचनालयाचे संचालक तथा मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचे माजी मुख्याध्यापक बाळकृष्ण मुळीक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या सत्काराबद्दल सावंत-राणे मॅडम यांनी वाचनालयाचे आभार व्यक्त केले. त्यांनी वाचनालायाला आर्थिक स्वरूपाची मदतही केली. यावेळी वाचन मंदिरामध्ये वर्षभर चांगले वाचन केलेल्या वाचक बी. एन. सामंत, सौ.शुभांगी धर्मा यांचाही शाल ,श्रीफळ तर सौ. संगीता मेस्त्री, निलेश मुळीक, राज तळणकर, याज्ञनिका साटेलकर यांना प्रमाणपत्र, एक पुस्तक, रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वाचन मंदिरचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, वाचनालयाचे संचालक माजी मुख्याद्यापक बाळकृष्ण मुळीक, स्नेहा खानोलकर, महेश पंतवालवलकर, उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, वाचनालयाचे ग्रंथपाल आनंद देवळी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page