बांदा खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

ग्रंथ प्रदर्शन आणि ग्रंथ समीक्षण स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग

⚡बांदा ता.१६-: लोकांचे राष्ट्रतीपती अशी ओळख असणाऱ्या भारताचे लाडके नेतृत्व भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस जगभरात विदयार्थी दिवस म्हणून आणि सोबतच महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. विविध कार्यक्रमांचे आयोजन करून डॉ कलाम यांना जगभरातून आदरांजली वाहिली जाते.

खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल आणि डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथेही डॉ. कलाम यांची जयंती उत्साहात साजरी केली गेली. ग्रंथ प्रदर्शना सोबत प्रशालेचे ग्रंथपाल संतोष परब यांनी आयोजित केलेल्या ‘ग्रंथ समीक्षण स्पर्धेस’ विद्यार्थ्यांचा भरघोस सहभाग लाभला. आपल्याला आवडलेल्या ग्रंथाचे समीक्षण भाषण स्वरूपात सादर करणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्राचार्या एम. एम. सावंत यांनी चौफेर वाचन करून ज्ञानी बना असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. प्रमुख वक्ते सुर्यकांत सांगेलकर यांनी डॉ. कलाम यांचे जीवनचरित्र थोडक्यात मांडले आणि मोबाईल पासून दूर जात उत्तम पुस्तकांच्या वाचनाने जीवन समृद्ध बनवा असा कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला. पुस्तक समीक्षण स्पर्धेत प्रणव नाईक, सिध्दी तळगावकर, तन्वी वझे, आकांक्षा सावंत आणि सिमंतीनी वालावलकर या विद्यार्थ्यांनी गुणानूक्रमांक प्राप्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सावळ यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुजा गावडे, रसिका भिसे यांचे सहकार्य लाभले. या प्रसंगी उपप्राचार्य पी. यू. देसाई, ज्येष्ठ शिक्षक एस. व्ही. नाईक, इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page