Headlines

समतेच्या विचारांना शिक्षणाची जोड देऊन छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक क्रांती घडवली-:प्राचार्य कैलास राबते…

⚡मालवण ता.२९-: छत्रपती शाहू महाराज हे केवळ एका संस्थानाचे राजे नव्हते तर भारतीय समाज जीवनाला समतेची
नवी जाणीव करून देणारे युग द्रष्टे समाज सुधारक होते समतेचे तत्व केवळ विचारात नव्हे तर शासन व्यवहारात ही उतरविणारे शाहू महाराज आधुनिक भारताच्या सामाजिक लोकशाहीचे अग्रदूत ठरले समतेच्या विचारांना शिक्षणाची जोड देऊन छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक क्रांती घडवली असे प्रतिपादन मालवण येथील स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते यांनी येथे बोलताना केले

मालवण येथील स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य कैलास राबते हे होते प्रारंभी प्राचार्य कैलास राबते यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तर हिंदी विभाग प्रमुख डॉ एच एम चौगले यांनी प्रास्ताविक केले

यावेळी बोलताना प्राचार्य राबते यांनी शिक्षण म्हणजे केवळ अक्षर ओळख नव्हे तर ते माणसाला विचार देणारी स्वाभिमान जागवणारी आणि समाजाला नव्या मूल्यांकडे नेणारी परिवर्तनशील शक्ती आहे म्हणूनच शाहू महाराजांनी शिक्षणाला सामाजिक न्यायाचा पाया मानले समाजातील वंचित शोषित आणि दुर्बल घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी शिक्षणाची दारे सर्वांच्या साठी खुली केली शाळा वस्तीगृहे आणि विविध शैक्षणिक सुविधा उभारून त्यांनी ज्ञानाच्या प्रवाहाला सामाजिक सामाजिक समतेची दिशा दिली
सिंहासन हे सत्तेच्या वैभवासाठी नसते तर ते लोककल्याण्याच्या जबाबदारीचे प्रतीक असते या विचारांची प्रचिती शाहू महाराजांच्या कारकीर्दीत दिसून येते राज्यकर्ता हा जनतेच्या सुखदुःखाशी एकरूप झाला तरच सत्ता अर्थपूर्ण ठरते हा संदेश शाहू महाराजांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला त्यांनी घेतल्या प्रत्येक निर्णयामध्ये राजकारणापेक्षा सामान्य माणूस आणि माणुसकी यानाच सर्वोच्च स्थान दिले असेही प्राचार्य राबते यांनी सांगून स्त्री सशक्तिकरणाचा पाया शिक्षणात आहे याची जाणीव शाहू महाराजांना होती म्हणून महिलांच्या साठी शिक्षणाची दारे खुली केली आणि समाजाच्या प्रगतीला नवे अधिष्ठान दिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली ही मदत एका व्यक्तीला नव्हे तर भारताच्या भवितव्याला एक प्रकारचे बळ दिले आपल्या संस्थानात पन्नास टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करून शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचा पाया घातला असे ते म्हणाले

यावेळी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होती शेवटी डॉ उज्वला सामंत यांनी उपस्थितांचे आभार मानले

You cannot copy content of this page