वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्ला तालुक्यातील
वायंगणी साळगावकरवाडी येथील रहिवासी व
ताडदेव मुंबई येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले
सावळाराम पुरुषोत्तम साळगावकर यांची
नागपूर पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. यानिमित्त त्यांचा वायंगणी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी ठाकरे शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा वायंगणी ग्रामपंचायत माजी सरपंच सुमन कामत, योगेश तांडेल, प्रवीण राजापूरकर, सुधर्मा कावले, उल्हास कामत, ओंकार पंडित, नारायण पेडणेकर, डॉ. सुनील साळगावकर, संतोष साळगावकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. साळगावकर यांच्या या नियुक्तीबाबत त्यांचे वेंगुर्ला तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
वेंगुर्ला वायंगणी येथील सुपुत्राची नागपूर पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती
