बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या त्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

वेंगुर्ला

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे उप जिल्हाप्रमुख सचिन देसाई ,सुनील डुबळे व बाळा दळवी यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर त्यांचे वेंगुर्ले येथे बाळासाहेबांचे शिवसेना वेंगुर्ला शिवसेना शाखेत त्यांचे शाल श्रीफळ घालून स्वागत करण्यात आले

यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख सचिन वालावलकर ,उप तालुका प्रमुख देवा कांबळी, उप तालुकाप्रमुख कौशिक परब ,शिरोडा ग्रामपंचायत सदस्य प्राची नाईक ,उपजिल्हाप्रमुख सुनील
मोरजकर,शाखाप्रमुख होडावडा परेश मुळीक, यशवंत परब,युवा तालुकाप्रमुख दादा सारग आदी उपस्थित होते.

आम्हाला निष्क्रिय उपजिल्हाप्रमुख अशी हिनपने प्रतिक्रिया उद्धव ठाकरे शिवसेनेच्या गटाने दिली मात्र येत्या एक महिन्यात आम्ही संघटना बळकट करून आम्ही किती सक्षम होतो हे विरोधकांना दाखवून देऊ असा इशारा उद्धव ठाकरे शिवसेनेला बाळासाहेबांची शिवसेना यामध्ये पक्षप्रवेश केलेल्या उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई यांनी इशारा दिला आहे खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचा पक्षप्रवेश केल्यानंतर आमचा फोटो त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट करून आम्हाला खऱ्या अर्थाने योग्य तो सन्मान दिला मुख्यमंत्री हा सामान्यांचा कसा आहे हे त्यांच्या भेटीतून आम्हाला समजले असेही देसाई यांनी सांगितले

आम्ही पहिल्यापासूनच बाळासाहेबांचेच शिवसैनिक होतो शिवसेनेच्या पडत्या काळात व सत्तेत असतानाही आम्ही शिवसेनेची बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून ठामपणे राहिलो मात्र आता आम्हाला अडगळीतले म्हणून आमचे अवहेलना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पदाधिकारी करत होते मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आम्ही प्रवेश केल्यानंतर आम्ही निष्क्रिय की सक्रिय हे त्यांना दाखवून देऊ असे मत उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी यांनी व्यक्त करत शिवसेनेवर निशाणा साधला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील आरोग्याच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांची लक्ष वेधून वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाला योग्य तो कर्मचारी वर्ग तज्ञ डॉक्टर व आरोग्य सुविधा त्याचबरोबर बंदावस्थेत असलेले सेंट्लुक हॉस्पिटल शासनाकडे हस्तांतरित होण्याकरिता मागणी ही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली त्याचबरोबर तत्काळ अनेक विकास कामांकरिता 70 कोटीचा निधीही मुख्यमंत्र्यांनी तत्काळ जाहीर केला त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी खऱ्या अर्थाने तळमळ असणारा मुख्यमंत्री कसा असतो हे आम्हाला या भेटीतून जाणवले असे उद्गगार उपजिल्हाप्रमुख व माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे यांनी काढले

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना या पक्ष कार्यालयाचे पहिले कार्यालय वेंगुर्ले येथे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले यानंतर वेंगुर्ले तालुक्यात मोठ्या प्रमाणात कार्यालयाच्या उद्घाटनादिवशी अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाळासाहेबांच्या शिवसेनेत झाला त्यानंतर मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत तीन उपजिल्हाप्रमुखांचा पक्षप्रवेश झाला ही गौडदौड पुढे अशीच सुरू राहील येत्या एक महिन्यात बाळासाहेबांची शिवसेना ही वेंगुर्ले तालुक्यात भक्कमपणे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक कटिबद्ध असल्याचे मत बाळासाहेब यांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी उद्गार काढले यावेळी शहर प्रमुख सचिन वालावलकर यांनी स्वागत व आभार मानले

फोटो ओळी

बाळासाहेबांची शिवसेना पक्षात मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई तीन उपजिल्हाप्रमुखांनी प्रवेश केल्यानंतर वेंगुर्ले बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालयात शाल व श्रीफळ देऊन स्वागत करताना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर सोबत उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे सचिन देसाई बाळा दळवी व पदाधिकारी कार्यकर्ते

You cannot copy content of this page