हरकुळ खुर्द खालची तेलीवाडीच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य

ग्रामस्थांनी घेतली आम. नितेश राणेंची भेट

⚡कणकवली ता.१६-: हरकुळ खुर्द खालची तेलीवाडी येथील विकास कामे वारंवार मागणी व पाठपुरावा करून देखील दुर्लक्षित राहिलेली आहेत. हरकुळ खुर्द व्हावटवाडी, मासयेवाडी, खालची तेलीवाडी पंतप्रधान सडक रस्ता ते खालीची तेलीवाडी जि.प. शाळा रस्ता तयार करणे, हरकुळ खुर्द खालची तेलीवाडी येथे पाण्याची विहीर बांधणे, हरकुळखुर्द खालची तेलीवाडी मध्ये स्ट्रीट साईट बनविणे तसेच हरकुळ खुर्द येथे स्मशान शेड बनवणे ही कामे मंजूर करा अशी मागणी हरकुळ खुर्द मधील ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेत निवेदनाद्वारे केली.
यामध्ये खालची – तेलीवाडी रस्त्याकरिता आमदार निधीतून तातडीने निधी देण्याची ग्वाही आमदार नितेश राणे यांनी दिली.

तर जल जीवन मिशन अंतर्गत विहिरीचे काम तातडीने घेण्याबाबत सूचना देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. तसेच या कामांकरिता आवश्यक निधी देखील तातडीने मंजूर केला जाईल अशी ग्वाही आम. नितेश राणे यांनी याप्रसंगी दिली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्यासह चंद्रकात खानविलकर, दत्ताराम खानविलकर, विलास खानविलकर, शशिकांत खानविलकर, शरद खानविलकर, संतोष खानविलकर, सत्यवान खानविलकर, नारायण खानविलकर, विलास खानविलकर, रमेश खानविलकर, विशाखा खानविलकर, श्रद्धा खानविलकर, दर्शना खानविलकर, लक्ष्मी खानविलकर, सुनीता खानविलकर, तेजस्विनी खानविलकर, रेश्मा खानविलकर, सुचिता खानविलकर, सुनीता खानविलकर, वनिता खानविलकर, सुधाकर खानविलकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page