Headlines

भाचे नीलू, नीतूच्या वायफळ गृहीत धरण्याची गरज नाही

उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राणे बंधूंना पुन्हा डिवचले ⚡सावंतवाडी ता.२३-: दिशा सालियान हीचा मृत्यू अपघाती झाला असल्याचे सी.आय.डी. जाहीर केले आहे. त्यावरून माझे दोन्ही भाचे निलू आणि नीतू हे बालिशपणे वायफळ बडबड करत असतात. त्याची ही वायफळ बडबड गृहीत धरण्याची गरज नाही असा टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सावंतवाडी येथील आयोजित…

Read More

मालवणमध्ये २६ व २७ रोजी इंडियन ऑइल पुरस्कृत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा

⚡मालवण ता.२३-: ‘इंडियन ऑइल’ पुरस्कृत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन मालवणमधील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या ‘श्रीमती सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉल’मध्ये दि.२६ व २७ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे. शहरातील मुलांएवढीच किंबहुना जास्तच क्रीडा गुणवत्ता ग्रामीण भागातील मुलांमध्ये असते; पण योग्य मार्गदर्शनाअभावी ती मागे पडतात. या मुलांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून गेली १५…

Read More

कट्टा येथे मालवण तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

⚡मालवण ता.२३-: कट्टा येथील वराडकर हायस्कूलच्या सिद्धिविनायक सभागृहात मालवण तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे उद्घाटन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनील नाईक यांनी दीप प्रज्वलनाने केले. यावेळी व्यासपीठावर सचिव विजयश्री देसाई, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघाचे अध्यक्ष व तालुका क्रीडा समन्वयक…

Read More

मत्स्य संपदा योजनेंतर्गत लाभार्थ्यांची वाटचाल उत्साह वाढविणारी- रत्नाकर राजम

⚡मालवण ता.२३-: भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मत्स्य निर्यातदार देश असून देशात मत्स्य व्यवसायाच्या प्रगतीला अजून खूप मोठा वाव आहे. पंतप्रधान मत्स्य संपदा योजना त्यादृष्टीने महत्वाची ठरते आहे. सिंधुदुर्गात मत्स्य संपदा योजनेंतर्गत विविध लाभार्थ्यांची सुरू असलेली वाटचाल नक्कीच इतरांचा उत्साह वाढविणारी आहे, असे प्रतिपादन प्रभारी सहाय्यक मत्स्य आयुक्त रत्नाकर राजम यांनी येथे केले. मालवण दांडी येथील…

Read More

महाप्रबोधन यात्रेमुळे कणकवलीतील राणेंची उरली सुरली दहशत पण संपली…

सुषमा अंधारे; दिपक केसरकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही गद्दारी करून भाजपात जाणार.._* ⚡सावंतवाडी ता.२३-: महाप्रबोधन यात्रेनिमित्त कणकवली येथे झालेल्या सभेतून कणकवली येथील राणेंची उरली सुरलेली दहशत पण संपली असा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहे. त्या काल पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून, त्या आज सावंतवाडी येथे आल्या असताना, पत्रकार…

Read More

शालेय जीवनात मैदानी खेळ महत्वाचे

पोलीस निरीक्षक शामराव काळे बांदा/प्रतिनिधीस्पर्धेत टिकायचे असेल तर बौद्धीक क्षमतेबरोबरच शारीरिक तंदुरुस्ती देखील तितकीच महत्वाची आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. शालेय जीवनाची प्राथमिक ही पहिली पायरी असल्याने मैदानी खेळांसाठी शाळांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी येथे केले.येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ चा शालेय क्रीडा महोत्सव…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

दोन तालुकाप्रमुखांना उपजिल्हाप्रमुख पदी बढती ⚡कणकवली ता. २३-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील, असे युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात…

Read More

राज ठाकरे यांच्या दौऱ्या निमित्त उपरकर यांनी घेतला आढावा…

ग्रामपंचायत निवडणुकीबाबत सुद्धा झाली चर्चा.._ ⚡सावंतवाडी ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत आहेत. तसेच ग्रामपंचायत निवडणुका १८ डिसेंबर रोजी होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उर्फ (जीजी) उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी शहर मध्यवर्ती कार्यालयात सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात सावंतवाडी पासून सुरू होणाऱ्या दौऱ्याचा तसेच ग्रामपंचायत…

Read More

पंकज बिद्रे ठरले नवजात अर्भकासाठी देवदूत

प्लेटलेट्स देऊन वाचविले प्राण;माजी नगराध्यक्ष संजू परब यांनीही केले विशेष प्रयत्न सावंतवाडी : सावंतवाडी येथील संजिवनी बालरूग्णालयामध्ये अॅडमिट असलेल्या ५ दिवसीय बालकाला (A- निगेटिव्ह) या दुर्मिळ रक्तगटाच्या प्लेटलेट्सची अत्यंत तातडीने गरज होती. तेव्हा सावंतवाडीतील पंकज बिद्रे यांनी ओरोस जिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये जाऊन प्लेटलेट्स डोनेशन केले. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी यासाठी विशेष प्रयत्न…

Read More

*आरोस येथील श्री देवी माऊली देवस्थानचा १ डिसेंबर रोजी जत्रोत्सव

⚡सावंतवाडी ता.२२सहदेव राऊळ- आरोस येथील जागृत देवस्थान व हाकेला धावणारी नवसाला पावणारी म्हणून ख्याती असलेल्या श्री देवी माऊली देवतेचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार १ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक विधी, अभिषेक त्यानंतर केळी-नारळ ठेवणे, ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या…

Read More
You cannot copy content of this page