⚡मालवण ता.२३-: कट्टा येथील वराडकर हायस्कूलच्या सिद्धिविनायक सभागृहात मालवण तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेचे उद्घाटन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनील नाईक यांनी दीप प्रज्वलनाने केले. यावेळी व्यासपीठावर सचिव विजयश्री देसाई, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघाचे अध्यक्ष व तालुका क्रीडा समन्वयक अजय शिंदे, जिल्हा बुद्धिबळ सर्कलचे अध्यक्ष सुयोग धामापूरकर, सचिव व राष्ट्रीय पंच श्रीकृष्ण आडेलकर, पंच रुपेश खोबरेकर, पंच उदय मालवणकर, वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय नाईक, इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक ऋषी नाईक तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वीतेसाठी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक संजय पेंडुरकर, रामकृष्ण सावंत, किसन हडलगेकर, दीपक जाधव, कमलेश गोसावी, महेंद्र वारंग तसेच तालुक्यातील क्रीडा शिक्षकांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेतून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली.
जिल्हा स्पर्धेसाठी निवडलेले खेळाडू : १४ वर्षांखालील मुलगे-प्रथम : पलाश सरजोशी (आचरा इंग्लिश मीडियम स्कूल), द्वितीय कुंदन नाटेकर (न्यू इंग्लिश स्कूल आचरा), तृतीय- दिवेश (माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी), चौथा – दुर्वेश तळाशीलकर (जय गणेश इंग्लिश स्कूल मालवण), पाचवा – ऋग्वेद बागवे (भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे ). मुली- प्रथम : कस्तुरी नलावडे (टोपीवाला हायस्कूल), द्वितीय: श्रेया चांदरकर (वराडकर हायस्कूल कट्टा), तृतीय : वैष्णवी परब ( माध्यमिक विद्यामंदिर मंदिर असरोंडी), चौथा – आर्या गावडे (वराड हायस्कूल), पाचवी–कविता चव्हाण ण (माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी). १७ वर्षांखालील मुली- प्रथम : सृष्टी गोसावी (जय गणेश इंग्लिश स्कूल मालवण), द्वितीय आदिती तिळवे (वराडकर हायस्कूल कट्टा), तृतीय :तन्वी दिघे (जय गणेश स्कूल मालवण), चौथी : वैष्णवी कदम (टोपीवाला हायस्कूल), पाचवी ऋचा बागवे (भरतगड इंग्लिश स्कूल मसुरे), १७ वर्षांखालील मुले- – प्रथम : हितेश आनंद मालवणकर, द्वितीय-आर्यन देवीदास प्रभूगावकर (टोपीवाला हायस्कूल), तृतीय : आदित्य आनंद मिठबावकर (भंडारी हायस्कूल), चौथा : बिरू नागू मानवर (कुडाळकर हायस्कूल मालवण), पाचवा : सीताराम परब (वराडकर हायस्कूल कट्टा). १९ वर्षांखालील मुली- प्रथम :- शताब्दी जुवेकर, द्वितीय : सिमरन गावकर (टोपीवाला हायस्कूल), १९ वर्षांखालील मुलगे – प्रथम – स्मित बेंजामिन गोम्स, द्वितीय-रोहन काशिनाथ गावडे (वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा), तृतीय- विराज यशवंत मिठबावकर (भंडारी ज्युनियर कॉलेज), चौथा-गिरीश दत्ताराम पालव (वराडकर हायस्कूल कट्टा), पाचवा : सूर्यकांत प्रमोद परब (वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा). तालुक्यातील १३ विद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना अजय शिंदे, सुनील नाईक, सुयोग धामापूरकर, संजय नाईक यांनी शुभेच्छा दिल्या.
