मालवणमध्ये २६ व २७ रोजी इंडियन ऑइल पुरस्कृत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा

⚡मालवण ता.२३-: ‘इंडियन ऑइल’ पुरस्कृत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन मालवणमधील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या ‘श्रीमती सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉल’मध्ये दि.२६ व २७ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे.

शहरातील मुलांएवढीच किंबहुना जास्तच क्रीडा गुणवत्ता ग्रामीण भागातील मुलांमध्ये असते; पण योग्य मार्गदर्शनाअभावी ती मागे पडतात. या मुलांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून गेली १५ ते२० वर्षे इंडियन आईल लिमिटेड कंपनी ग्रामीण भागात कॅरम, बुद्धीबळ, बॅडमिंटन, टेबल टेनिस, ब्रिज, क्रिकेट या खेळांच्या स्पर्धा आणि प्रशिक्षण शिबिरे राष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थिती मध्ये आयोजित करत आहे. याचाच एक भाग म्हणून मालवणमध्ये २०१८ पासून कोरोना महामारीची दोन वर्षे वगळून दरवर्षी इंडियन आईल लिमिटेड कंपनी मालवण टेबल टेनिस अकॅडमीला टेबल टेनिस स्पर्धा आयोजनाला पुरस्कृत करते. यावर्षी दि.२६ व २७ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त टेबल टेनिस स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन मालवण टेबल टेनिस अकॅडमीचे संचालक विष्णू कोरगावकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page