उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राणे बंधूंना पुन्हा डिवचले
⚡सावंतवाडी ता.२३-: दिशा सालियान हीचा मृत्यू अपघाती झाला असल्याचे सी.आय.डी. जाहीर केले आहे. त्यावरून माझे दोन्ही भाचे निलू आणि नीतू हे बालिशपणे वायफळ बडबड करत असतात. त्याची ही वायफळ बडबड गृहीत धरण्याची गरज नाही असा टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत लगावला आहे
