महाप्रबोधन यात्रेमुळे कणकवलीतील राणेंची उरली सुरली दहशत पण संपली…

सुषमा अंधारे; दिपक केसरकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही गद्दारी करून भाजपात जाणार.._*

⚡सावंतवाडी ता.२३-: महाप्रबोधन यात्रेनिमित्त कणकवली येथे झालेल्या सभेतून कणकवली येथील राणेंची उरली सुरलेली दहशत पण संपली असा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहे. त्या काल पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून, त्या आज सावंतवाडी येथे आल्या असताना, पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

यावेळी त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, येथील गद्दार मंत्री दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे यांचा देखील केसाने गळा कापून, आगामी निवडणुका पूर्वी ते भाजप मध्ये उडी मारतील असे सांगत प्रामाणिक पणाचे विरुद्धार्थी शब्द म्हणजे आम. केसरकर असा टोला देखील त्यांनी यावेळी आम. केसरकर यांना लगावला आहे.

You cannot copy content of this page