Headlines

मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळा आणि हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे गंधर्व महाविद्यालयाच्या संगीत परीक्षेत घवघवीत यश…

⚡मालवण ता.०२-: अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ आयोजित एप्रिल- मे २०२५-२६ सत्रातील शास्त्रीय संगीत परीक्षेत मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेच्या व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विविध गायन, हार्मोनियम व तबला परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी तसेच विशेष योग्यता श्रेणी प्राप्त करून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

भंडारी एज्यूकेशन सोसायटी प्राथमिक शाळेतील गायन प्रारंभिक परीक्षेत श्रीनिधी तारी, आरोही शिंदे, गार्गी मडये आणि विजय सारंग या विध्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, तर योगिता चव्हाण, वीर कांबळी आणि स्वरा कांदळगावकर या विध्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली.

गायन प्रवेशिका पूर्ण परीक्षेत हायस्कूलच्या रिद्धी मडये, श्रेया शिंदे आणि रेणुका चव्हाण या विध्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, तर वैष्णवी आंबेरकर, खुशी सावंत, पूर्वा चोपडेकर, नागेंद्र तारी आणि कृपा साळगावकर या विध्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली.

हार्मोनियम प्रवेशिका प्रथम परीक्षेत यशश्री मोरजकर हिने प्रथम श्रेणी, तबला प्रारंभिक परीक्षेत विघ्नेश वालावलकर याने विशेष योग्यता श्रेणी, तर तबला प्रवेशिका पूर्ण परीक्षेत हिमांशू मालवणकर याने प्रथम श्रेणी मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.

या सर्व विद्यार्थ्यांना संगीत शिक्षक श्री. विजय बोवलेकर आणि श्री. मंगेश कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल
संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर,चेअरमन सुधीर हेरेकर मुख्याध्यापक आर डी बनसोडे प्राथमिकचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी तसेच मार्गदर्शक शिक्षक, सर्व यशस्वी विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे

You cannot copy content of this page