दोन तालुकाप्रमुखांना उपजिल्हाप्रमुख पदी बढती
⚡कणकवली ता. २३-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील, असे युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
खांदेपालट केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा युवा अधिकारी मंदार शिरसाट (सावंतवाडी, कुडाळ-मालवण विधानसभा), उपजिल्हा युवा अधिकारी सागर नानोसकर (सावंतवाडी विधानसभा), पंकज वर्दम (कुडाळ मालवण विधानसभा), तालुका युवा अधिकारी- मदन राणे (दोडामार्ग तालुका), पंकज शिरसाट (वेंगुर्ला तालुका), योगेश नाईक (सावंतवाडी तालुका), मंदार गावडे (मालवण तालुका).योगेश धुरी (कुडाळ तालुका), तालुका समन्वयक – योगेश तावडे (कुडाळ तालुका), मंदार ओरसकर (मालवण तालुका), गुणाजी गावडे (सावंतवाडी तालुका), विधानसभा समन्वयक (युवती) – शिल्पा खोत (कुडाळ- मालवण विधानसभा), जिल्हा युवा अधिकारी – सुशांत नाईक (कणकवली विधानसभा), जिल्हा समन्वयक गीतेश कडू, उप-जिल्हा युवा अधिकारी अतुल सरवटे (वैभववाडी तालुका), – निनाद देशपांडे (देवगड तालुका), ललित घाडीगावकर, युवासेना (कणकवली तालुका), तालुका युवा अधिकारी फरीद युसुफ काझी (देवगड – तालुका- फणसगाव, पडेल, पुरळ, विजयदुर्ग, नाडण, पोभूर्ले जि. प. मतदारसंघ), गणेश जगदीश गावकर, देवगड तालुका, (देवगड शहर व शिरगाव, टेंबवली, किंजवडे, कुणकेश्वर, मिठबाव जि. प. मतदारसंघ), रोहित रावराणे (वैभववाडी तालुका), उत्तम सुरेश लोके (कणकवली तालुका अधिकारी). अशा नियुक्ती करण्यात आल्या आहेत.
कणकवली विधानसभा मतदारसंघात चार युवा सेनेचे तालुका प्रमुख नेमण्यात आले असून, युवा सेनेकडून कणकवली विधानसभा मिशन राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षाच्या नेत्यांकडून अभिनंदन करण्यात आले.
