*आरोस येथील श्री देवी माऊली देवस्थानचा १ डिसेंबर रोजी जत्रोत्सव

⚡सावंतवाडी ता.२२सहदेव राऊळ- आरोस येथील जागृत देवस्थान व हाकेला धावणारी नवसाला पावणारी म्हणून ख्याती असलेल्या श्री देवी माऊली देवतेचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार १ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक विधी, अभिषेक त्यानंतर केळी-नारळ ठेवणे, ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटी व आरोस ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page