Headlines

स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी वाचन, मनन वाढवा

प्रा.रुपेश पाटील यांचे आवाहन : शिवराज विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न ⚡कुडाळ ता.३०-: विद्यार्थी जीवनात नेहमीच मनात प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, त्यासाठी आपण प्रतिभावंत व्यक्तींची पुस्तके वाचली पाहिजेत. ग्रंथालयाची कास धरली पाहिजे. ग्रंथ आपल्याला सशक्त बनवतात, आपण जसा विचार करतो, तसेच आपण पुढे घडतो म्हणून सकारात्मक विचार ठेवा, मोबाईलच्या मोहात पडू नका, आज चांगला माणूस…

Read More

बिडवाडी माध्यमिक विद्यालयातील
वादविवाद स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

⚡कणकवली ता.३०-: माध्यमिक विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय बिडवाडी येथे आंतर कनिष्ठ महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा संपन्न झाली. वादविवाद स्पर्धेचा विषय होता “बेरोजगार तरुणांसाठी अग्निवीर योजना योग्य कि अयोग्य “सदर वादविवाद स्पर्धा कणकवली तालुक्यासाठी मर्यादित होती. कणकवली तालुक्यातील बऱ्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय बिडवाडीच्या कु. किशोरी येरम…

Read More

निगुडे जाधववाडी रस्ता डांबरीकरणाचा माजी सरपंच समीर गावडे यांनी केला शुभारंभ

बांदा/प्रतिनिधीनिगुडे-जाधववाडी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मंजूर झाले असून सदर रस्त्याचे भूमिपूजन श्रीफळ वाढवून निगुडे माजी सरपंच समीर गावडे यांनी केले.श्री गावडे यांच्या सरपंच पदाचा कार्यकालचा शेवटचा दिवस असल्याने निगुडे गावातील विकास कामांना चालना देण्यासाठी विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे, नवनिर्वाचित सरपंच लक्ष्मण निगुडकर, ग्रामपंचायत सदस्य प्रताप गावडे, विठू गवंडे, ईशा तुळसकर, लक्ष्मी…

Read More

सकाळी सव्वा सहा वाजता सुटणार देवबाग बस इतर बस सुद्धा वेळेत सुटणार

आगार व्यवस्थापक बोवलेकर यांचे सुरेश बापर्डेकर यांना आश्वासन मालवण दि प्रतिनिधीमालवण आगारातून देवबाग साठी सुटणाऱ्या बसफेऱ्या वेळेत सुटत नसल्याबाबत तसेच देवबाग मार्गावर मिनीबस सोडण्यात यावी या मागणीसाठी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा तारकर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी दिल्यानंतर आज मालवणचे आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांच्याशी सुरेश बापर्डेकर व ग्रामस्थ यांनी केलेल्या चर्चेत आगार व्यवस्थापक…

Read More

देऊळवाडा पुल ते कोळंब रस्त्याची दुरावस्था

तात्काळ दुरुस्ती न केल्यास ३ जानेवारीला रास्ता रोको;;युवासेनेच्या मांजरेकर यांचा इशारा मालवण, दि प्रतिनिधीमालवण शहरातील देऊळवाडा पुल ते कोळंब पुल या सागरी महामार्गाची पूर्ण दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ हाती न घेतल्यास येत्या ३ जानेवारीला रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल असा इशारा युवासेनेचे पदाधिकारी सिद्धेश मांजरेकर यांनी दिला आहे. याबाबतचे…

Read More

घुमडे उपसरपंच पदी राजेश सावंत बिनविरोध

सावंत यांच्यासह नूतन सरपंच स्नेहल बिरमोळे यांनी स्वीकारला पदभार मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यातील घुमडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी राजेश (राजू) अशोक सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन सरपंच स्नेहल बिरमोळे आणि उपसरपंच राजू सावंत यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. राजू सावंत यांनी घुमडे ग्रा. पं. च्या मागील कालावधीत अडीच वर्षे उपसरपंच पद सांभाळले आहे. घुमडे ग्रामपंचायत…

Read More

तळकट येथील ६५ वर्षीय सुवर्णलता साळगावकर यांचे निधन

सावंतवाडी ता.२९-:तळकट कट्टा येथील सौ सुवर्णलता दत्ताराम साळगावकर वय 65 यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या पश्चात पती, विवाहित मुलगा, सून ,चार विवाहित मुली, जावई ,नातवंडे असा परिवार आहे माजी सैनिक दत्ताराम साळगावकर यांच्या त्या पत्नी तर  विकास सोसायटी लेखापरीक्षक सर्वेश साळगावकर यांच्या त्या आई होत

Read More

बेकायदा चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरला दणका

तहसीलदार श्रीधर पाटील यांची कारवाई मालवण दि प्रतिनिधीमालवणहून कणकवलीच्या दिशेने चिरे आणि दगडांची बेकायदेशीर रित्या वाहतूक करणाऱ्या एका डंपरवर (क्रमांक ५९९१) मालवणचे तहसीलदार श्री. श्रीधर पाटील यांनी कारवाई करीत डंपर ताब्यात घेतला. ही कारवाई कुपेरीच्या घाटीत करण्यात आली. मालवण तालुक्यातील।खाडीपट्यात बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतूक होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी असून याबाबत कारवाई होत नसल्याने गेले…

Read More

साकेडी गावच्या उपसरपंचपदी प्रज्वल वर्दम

⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुक्यातील साकेडी ग्रामपंचायतीची उपसरपंच पदासाठीची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. यामध्ये भाजप पुरस्कृत प्रज्वल वर्दम आणि अपक्ष उमेदवार दिगंबर वालावलकर यांच्यात लढत झाली. अखेर प्रज्वल वर्दम यांना ५ तर दिगंबर वालावलकर यांना २ मते मिळाली. त्यामुळे ३ मतांनी प्रज्वल वर्दम यांचा विजय होऊन उपसरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. दरम्यान ग्रामविकास अधिकारी…

Read More

भाजप कोकण विकास आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्कप्रमुख वैशाली राणे यांची निवड…

⚡मालवण ता.२९-: भाजप कोंकण विकास आघाडी मुंबई तर्फे सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्कप्रमुख म्हणून कणकवली येथील वैशाली राणे यांचे नियुक्ती मुंबई येथे करण्यात आली आहे वैशाली राणे या मुंबई येथे सांताक्रुज कलीना येथे सामाजिक क्षेत्रात वावरत असून पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना मुंबई प्रदेश अध्यक्ष म्हणून त्या कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असून विविध प्रश्नांबाबत…

Read More
You cannot copy content of this page