साकेडी गावच्या उपसरपंचपदी प्रज्वल वर्दम

⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुक्यातील साकेडी ग्रामपंचायतीची उपसरपंच पदासाठीची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. यामध्ये भाजप पुरस्कृत प्रज्वल वर्दम आणि अपक्ष उमेदवार दिगंबर वालावलकर यांच्यात लढत झाली. अखेर प्रज्वल वर्दम यांना ५ तर दिगंबर वालावलकर यांना २ मते मिळाली. त्यामुळे ३ मतांनी प्रज्वल वर्दम यांचा विजय होऊन उपसरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. दरम्यान ग्रामविकास अधिकारी गणेश कडुलकर, संजय तांबे यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी सरपंच सुरेश साटम, सदस्य जेहूर शेख, सुविधा गुरव, प्रेरणा जाधव, शाखा राणे, दिगंबर वालावलकर यांच्यासह चेतन अंधारी,पांडू वर्दम,प्रद्युम मुंज,सुरज ओरस्कर,प्रथमेश चव्हाण,यश अंधारी, वृद्र सापळे, कौशिक अंधारी, सिद्येश वालावलकर,आशिष वालावलकर,रोषन मांगले,चिन्मय वर्दम आदी उपस्थित होते.
भाजप पुरस्कृत उमेदवार निवडून यावा यासाठी जोरदार मोर्चे बांधणी करण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकी मध्ये साकेडी गावातील सरपंच सुरेश साटम याच्यासह सहा सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तर फक्त एकाच जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. तर एक जागा रिक्त राहिली.त्यामुळे भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यामुळे साकेडीचे नवनिर्वाचित उपसरपंच प्रज्वल वर्दम यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page