भाजप कोकण विकास आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्कप्रमुख वैशाली राणे यांची निवड…

⚡मालवण ता.२९-: भाजप कोंकण विकास आघाडी मुंबई तर्फे सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्कप्रमुख म्हणून कणकवली येथील वैशाली राणे यांचे नियुक्ती मुंबई येथे करण्यात आली आहे वैशाली राणे या मुंबई येथे सांताक्रुज कलीना येथे सामाजिक क्षेत्रात वावरत असून पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना मुंबई प्रदेश अध्यक्ष म्हणून त्या कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असून विविध प्रश्नांबाबत त्यांनी नेहमी आवाज उठवून न्याय देण्याचे कार्य केलेले आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या या निवडी सोबतच कणकवली तालुका संपर्कप्रमुख शिवानी गावडे, सौ दीपिका राणे सावंतवाडी तालुका, सौ ममता परब कुडाळ तालुका, सौ सुषमा कुरले मालवण तालुका, सौ रुजूला पंडित दोडामार्ग, सौ ज्योती सावंत वैभववाडी, साक्षी कार्लेकर देवगड, प्राची राणे वेंगुर्ला तालुका अशा पद्धतीने कोकण विकास आघाडीने नियुक्ती जाहीर केलेल्या आहेत.

You cannot copy content of this page