रामगड उपसरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जाधव यांची वर्णी…

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या कडून स्वागत ; ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता…

⚡मालवण ता.२९-: मालवण तालुक्यातील रामगड ग्रामपंचायतीवर माजी सभापती नाथ मालोंडकर यांच्या विशेष प्रयत्नातून महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. सरपंच पदावर शिवसेनेचे शुभम मटकर तर उपसरपंच पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जाधव यांची वर्णी लागली आहे.

 रामगड ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. माजी सभापती नाथ मालोंडकर यांचे सुत्रबद्ध नियोजन यावेळी कामी आले. नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी रामगड ग्रामपंचायत येथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे  तालुकाध्यक्ष विश्वास साठे, माजी सभापती नाथ मालोंडकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य अमित फोंडके, लक्षिता मेतर, उल्का तारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी ग्रामपंचायतीला यापुढे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पारदर्शक कारभार करावा आणि ग्रामस्थांनी दाखविलेला विश्वास सार्थकी लावावा, असे आवाहन केले.

You cannot copy content of this page