बेकायदा चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरला दणका

तहसीलदार श्रीधर पाटील यांची कारवाई

मालवण दि प्रतिनिधी
मालवणहून कणकवलीच्या दिशेने चिरे आणि दगडांची बेकायदेशीर रित्या वाहतूक करणाऱ्या एका डंपरवर (क्रमांक ५९९१) मालवणचे तहसीलदार श्री. श्रीधर पाटील यांनी कारवाई करीत डंपर ताब्यात घेतला. ही कारवाई कुपेरीच्या घाटीत करण्यात आली.

मालवण तालुक्यातील।खाडीपट्यात बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतूक होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी असून याबाबत कारवाई होत नसल्याने गेले काही दिवस प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत होती. अलीकडच्या चार पाच दिवसात ग्रामपंचायत निवडणुकांनंतर मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक याबाबत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

आज मालवणहून कणकवलीच्या दिशेने चिरे आणि वाळू यांची वाहतूक करणाऱ्या डंपरवर दस्तुरखुद्द मालवणचे तहसीलदार श्री. पाटील यांनी कारवाईचा बडगा उगारला. तहसीलदार श्री. पाटील यांनी हा डंपर ताब्यात घेतला.

You cannot copy content of this page