बिडवाडी माध्यमिक विद्यालयातील
वादविवाद स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

⚡कणकवली ता.३०-: माध्यमिक विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय बिडवाडी येथे आंतर कनिष्ठ महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा संपन्न झाली.


वादविवाद स्पर्धेचा विषय होता “बेरोजगार तरुणांसाठी अग्निवीर योजना योग्य कि अयोग्य “सदर वादविवाद स्पर्धा कणकवली तालुक्यासाठी मर्यादित होती. कणकवली तालुक्यातील बऱ्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय बिडवाडीच्या कु. किशोरी येरम व कु सिद्धी लाड यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर कणकवली कॉलेज कणकवलीच्या कु. दिव्या मगर व कु. दत्तप्रसाद शेट्ये यांनी द्वितीय क्रमांक मिळविला स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विद्यामंदिर प्रशाला कणकवलीचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. तानावडे ,जांभवडे हायस्कुलचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. कदम व श्रीम. आरती मराठे हे होते. स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी व पारितोषिक वितरणवेळी बिडवाडी गावचे सरपंच सुदाम तेली, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष दत्ताराम हिंदळेकर, माजी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अभिमन्यू लाड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंदराव साटम, बिडवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत चव्हाण, प्रशालेचे प्राचार्य श्री. एस. डी. जोशी, प्राध्यापिका सौ. आदिमाया सावंत, श्रीम. दिक्षा रेवडेकर, श्रीम. प्रगती परब, श्रीम. डांगमोडेकर , सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page