बांदा/प्रतिनिधी
निगुडे-जाधववाडी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मंजूर झाले असून सदर रस्त्याचे भूमिपूजन श्रीफळ वाढवून निगुडे माजी सरपंच समीर गावडे यांनी केले.
श्री गावडे यांच्या सरपंच पदाचा कार्यकालचा शेवटचा दिवस असल्याने निगुडे गावातील विकास कामांना चालना देण्यासाठी विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे, नवनिर्वाचित सरपंच लक्ष्मण निगुडकर, ग्रामपंचायत सदस्य प्रताप गावडे, विठू गवंडे, ईशा तुळसकर, लक्ष्मी दळवी, वर्षा जाधव, समीक्षा गावडे, माजी सरपंच जयराम गवंडे, ग्रामसेविका तनवी गवस, तलाठी भाग्यश्री शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष वासुदेव गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत जाधव, ग्रामस्थ विलास सावंत, चंद्रकांत जाधव, ठेकेदार दादा भाईप, विश्राम जाधव, गुरुनाथ जाधव, किशोर जाधव, दत्ताराम जाधव आदी उपस्थित होते.
निगुडे-मधलीवाडी याठिकाणी स्ट्रीट लाईटचे भूमिपूजन सरपंच श्री गावडे यांच्या हस्ते पार पडले. गावाच्या विकासासाठी आम्ही नियमित कार्यरत राहू, गाव विकासाच्या दृष्टीने नेण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू अशी ग्वाही सरपंच समीर गावडे यांनी यावेळी दिली.
फोटो :-
निगुडे येथे विकासकामांचे भूमिपूजन करताना सरपंच समीर गावडे. सोबत उपसरपंच गुरूदास गवंडे व इतर.
निगुडे जाधववाडी रस्ता डांबरीकरणाचा माजी सरपंच समीर गावडे यांनी केला शुभारंभ
