Headlines

“वैभववाडीत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना दिलासा” …

⚡वैभववाडी ता.१७-: बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर वैभववाडी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे भात कापणीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
​यंदा पावसाने ओढ दिल्याने वैभववाडी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी अनेक ठिकाणी भात आणि नाचणीची पिके करपून गेली, तर काही ठिकाणी पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
​दरम्यान, पावसाअभावी निर्माण झालेली पाणीटंचाई आणि भविष्यातील संभाव्य संकट लक्षात घेऊन प्रशासनाच्या माध्यमातून तसेच लोकसहभागातून तालुक्यात विविध ठिकाणी वनराई व कच्चे बंधारे बांधण्यात आले आहेत. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि विहिरी तसेच कूपनलिकांमधील पाणीसाठा वाढविणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.

You cannot copy content of this page