Headlines

बांद्यात रविवारी श्री दुर्गामाता दौड; हिंदू बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजन; सकाळी ९ वाजता प्रारंभ

बांदा/सकाळ वृत्तसेवा
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रविवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी बांदा येथे श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ठीक ९ वाजता श्री भूमिकामाता मंदिर येथून या दौडीला प्रारंभ होणार आहे. या दौडीत बांदा शहरासह परिसरातील सर्व हिंदू माता-भगिनी आणि हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या दौडीच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धा, हिंदू संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला जाणार आहे. दौडीदरम्यान बांदा परिसरातील विविध देवी मंदिरांचे दर्शन घेण्यात येणार आहे.
दौडीचा प्रारंभ श्री भूमिकामाता मंदिर येथून होईल. त्यानंतर आळवाडी देवीचे दर्शन, गांधी चौक मित्रमंडळ देवीचे दर्शन, छत्रपती शिवाजी महाराज चौक व कट्टा कॉर्नर येथील देवीचे दर्शन तसेच शेवटी निमजगावाडी देवीचे दर्शन घेण्यात येणार आहे.
धार्मिक उत्साह आणि भक्तिमय वातावरणात पार पडणाऱ्या या दौडीमध्ये सर्वांनी सहभागी होऊन श्री दुर्गामातेप्रती आपली श्रद्धा व्यक्त करावी, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page