वैभववाडी प्रतिनिधी
दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ, वैभववाडी यांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यंदा या शिबिराचे २१ वे वर्ष होते. या शिबिरात मंडळाच्या सदस्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. एकूण ३३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
या रक्तदान शिबिराचा शुभारंभ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शांताराम रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे यांनी ३५ वेळा रक्तदान पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सातत्याने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपणाऱ्या डॉ. पाताडे यांच्या सेवाभावी कार्याचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
याचप्रमाणे मंडळाचे श्री.संजय रावराणे आणि सिंधू रक्त प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष राजेश पडवळ यांचाही सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी कोल्हापूर ब्लड बँकेचे श्री. नयनीश मोरे आणि त्यांच्या संपूर्ण कर्मचारीवर्गाने मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्याबद्दल मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे आणि आरोग्यविषयक जनजागृती करणारे उपक्रम राबविण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून गरजू रुग्णांना मदत मिळावी आणि समाजात रक्तदानाविषयी जागरूकता वाढावी, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश आहे.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष संजय सावंत, खजिनदार गंगाधर केळकर, विवेक रावराणे, प्रशांत ढवण, रवी तांबे, सुधाकर रावराणे, आबू पारकर, आशिष रावराणे, तेजस आंबेकर, प्रशांत गुळेकर, नितीन महाडिक, बंडू गाड, सुरेंद्र नारकर, बंडू सावंत, अविनाश साळुंखे, ऋषिकेश घाडी, चिन्मय कानेटकर, जयंती पटेल, प्रथमेश रावराणे, संदीप मोरे, बाळू शिरवडेडकर, संतोष रावराणे, सुधीर खांबल, अंकित सावंत, सागर पांचाळ, ऋषिकेश पांचाळ, रविदीप पाटील, अमोल सुतार, यश पारकर, तुषार पारकर, सोनू भैय्या, गौरव रावराणे, मुकुंद रावराणे, अनंत शिंदे, प्रदीप साळुंखे,अमर पाटील आणि रोशन राणे आदी उपस्थित होते.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे, सचिव संजय रावराणे, पदाधिकारी, सदस्य आणि दुर्गाभक्तांनी परिश्रम घेतले.

