आरोग्य विभागाच्या ओएसडींकडून पाहणी; रिक्त पदे, एसी, स्वच्छता व रक्तपेढीच्या सुविधांचा घेतला आढावा..

⚡सावंतवाडी, ता. १७-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांची पाहणी करून त्या तातडीने सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या पातळीवर पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या ओएसडींनी दिली. आरोग्यमंत्री यांच्या सूचनेनुसार त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील उपलब्ध सुविधा, अडचणी आणि आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला.
पाहणी दरम्यान रुग्णालयातील व्हेंटिलेशनची समस्या, बंद असलेले एअर कंडिशनर, स्वच्छतेचा प्रश्न, आजूबाजूच्या खासगी मालमत्तांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी तसेच इतर पायाभूत सुविधांची माहिती घेण्यात आली. एअर कंडिशनर व इलेक्ट्रिकलशी संबंधित समस्या तातडीने दूर करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना देण्यात येतील. उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत सध्या रक्त उपलब्ध करून दिले जात आहे. भविष्यात रक्ताचे विविध घटक (ब्लड कॉम्पोनंट्स) उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच ऑपरेशन थिएटरमध्ये सुरू असलेली कामे, डॉक्टरांच्या विविध स्पेशालिटीची उपलब्धता आणि आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ यांचाही आढावा घेण्यात आला.रुग्णालयातील रिक्त पदांबाबत बोलताना ओएसडींनी सांगितले की, वर्ग तीनमधील बहुतांश पदे भरण्यात आली असून डॉक्टरांची काही पदे अद्याप रिक्त आहेत. राज्यात लवकरच सुमारे १,५०० डॉक्टरांची भरती करण्यात येणार असून कोकण विभागात अधिकाधिक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध व्हावेत, यासाठी विशेष धोरणात्मक उपाययोजना करण्याचे नियोजन आहे. येत्या महिनाभरात सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जास्तीत जास्त डॉक्टर व तज्ज्ञ सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.” तसेच सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न देखील मार्गी लागलेला आहे त्यामुळे लवकरच लवकर सुसज्ज इमारत उभे राहून सावंतवाडी करांच्या सेवेला लवकरच हॉस्पिटल देखील सुरू होईल असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश सभापती मॅडम, नगरसेवक बाबू कुडतरकर, नगरसेवक देव्या सुर्याजी, नगरसेविका शेरवरी धारगळकर, सुरज परब,
