देऊळवाडा पुल ते कोळंब रस्त्याची दुरावस्था

तात्काळ दुरुस्ती न केल्यास ३ जानेवारीला रास्ता रोको;;युवासेनेच्या मांजरेकर यांचा इशारा

मालवण, दि प्रतिनिधी
मालवण शहरातील देऊळवाडा पुल ते कोळंब पुल या सागरी महामार्गाची पूर्ण दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ हाती न घेतल्यास येत्या ३ जानेवारीला रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल असा इशारा युवासेनेचे पदाधिकारी सिद्धेश मांजरेकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी पोलीस ठाण्यासही दिले आहे.

शहरातील देऊळवाडा ते कोळंब हा सागरी महामार्ग खड्डेमय व धोकादायक बनला आहे. यंरस्त्यावर मोठे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले असून टेंडर प्रक्रिया होऊनही कामास दिरंगाई होत आहे. याचा त्रास नागरिक व वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या
रस्त्याच्या कामास तत्काळ सुरवात न केल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा मांजरेकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page