Headlines

कणकवलीत परतीच्या पावसाची जोरदार हजेरी…

वारा, विजांचा लखलखाट अन् ढगांचा गडगडाट:हवामान विभागाचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट ; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन..

⚡कणकवली ता.१७-: कणकवली तालुक्यात कणकवली शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये शनिवारी सायंकाळी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा, विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी बरसण्यास सुरुवात झाली. सायंकाळी ७ वा. च्या सुमारास अचानक सुरू झालेल्या पावसामुळे परिसरात पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कणकवली शहर आणि परिसरातील गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे परिसरातील वातावरणात बदल झाला. वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडांखाली किंवा उघड्या जागेत थांबणे टाळावे. तसेच सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परतीच्या पावसाच्या या जोरदार हजेरीमुळे कणकवली शहरासह ग्रामीण भागातही पावसाळी वातावरण अनुभवायला मिळाले.

You cannot copy content of this page