Headlines

आंबोलीत मोफत शिक्षण व राहण्याची व्यवस्था असलेल्या भव्य शाळेला मंजूरी…

मंत्री दिपक केसरकर; लवकरच कामाला सुरवात ⚡सावंतवाडी ता.०७-:सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी आपण पाचशे मुलांच्या राहण्याची व शिक्षणाची मोफत व्यवस्था असलेली भव्य शाळा आंबोली गेले येथे मंजूर केली आहे लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचेही माहीती मंत्री दिपकर केसरकर यांनी आज येथे दिली.श्री केसरकर यांनी सावंतवाडी येथे आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते…

Read More

धामापूर तलावातील पाण्याच्या पातळीत होतेय घट;

मालवण शहरात होणार एक दिवस आड पाणीपुरवठा ⚡मालवण ता.०७-: मालवण नगरपरिषदेतर्फे धामापूर तलावातून होणाऱ्या शहर पाणी पुरवठा योजनेमार्फत मालवण शहरात व शहराबाहेर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र सध्या धामापूर तलाव क्षेत्रातील पाण्याची पातळी कमी होत असल्यााने नगरपरिषदेमार्फत शहरात करण्यात येणारा पाणी पुरवठा दि. १० एप्रिल पासून एक दिवस आड करण्यात येईल,याची मालवण शहरातील सर्व…

Read More

रेवतळे येथील तरुण बेपत्ता

⚡मालवण ता.०७-: मालवण रेवतळे येथील सुनील महादेव खरात (वय ३०) हा तरुण दि. ४ एप्रिल पासून बेपत्ता असल्याची खबर त्याची आई पार्वती महादेव खरात यांनी मालवण पोलीस स्थानाकात दिली आहे. पार्वती खरात यांनी पोलिसात दिलेल्या खबरी नुसार दि. ४ एप्रिल रोजी रात्री सुनील खरात हा कोणालाही न सांगता निघून गेला. त्याचा शोध घेतला मात्र, अद्यापपर्यंत…

Read More

पर्यटनवाढीसाठी जिल्ह्यात ‘मान्सून धमाका फेस्टीवल’

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित होऊन 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यामध्ये पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पावसाळ्यामध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी “मान्सून धमाका फेस्टीवलचे” आयोजन करण्यात येणार आहेत. या फेस्टीवलपूर्वी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा प्रशासनाने उपलब्ध करुन द्याव्यात,…

Read More

१२ रोजी व्यक्तिमत्त्व विकास आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबिर

बांदा येथील डॉ शंकर मोडक प्रतिष्ठानचे आयोजन बांदा/प्रतिनिधीडॉ. शंकर मोडक प्रतिष्ठान, बांदा यांच्या वतीने बुधवार दिनांक १२ रोजी येथील आनंदी मंगल कार्यालयात व्यक्तिमत्व विकास आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबीर निशुल्क व सर्वांसाठी खुले असून सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. नकुल पार्सेकर…

Read More

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत बांदा केंद्रशाळेचे सुयश

⚡बांदा ता.०७-: युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत बांदा नं.१केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून या परीक्षेत शाळेतील ३१ विद्यार्थ्यांनी मेडल प्राप्त केली आहेत . युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता दुसरी ,तिसरी ,चौथी, सहावी व सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे फेब्रुवारी ‌२०२३ मध्ये आयोजन करण्यात आले होते यामध्ये शाळेतील विहान…

Read More

संजय राऊत सारख्या मच्छरला मारण्यासाठी मोठे गँगस्टर लागत नाहीत

आम.नितेश राणे यांचा टोला; धमकी आल्याची केवळ नौटंकी ⚡कणकवली ता.०७-: संजय राऊत यांना कोणतीही धमकी बिस्नोई गॅंगकडून आलेले नाही असे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे .मच्छरला मारण्यासाठी मोठे गँगस्टर लागत नाहीत.असा टोला आम.नितेश राणे यांनी लगावताना उद्धव ठाकरे ,आदित्य ठाकरे, संजय राऊत हे डरपोक आहेत यांचे पोलीस संरक्षण काढून घ्या मग हे लोक बाहेर पडणार…

Read More

वीज खांबांना धोकादायक ठरणाऱ्या फांद्या तोडल्याने नागरिकांमध्ये समाधान

⚡मालवण ता.०७-: मालवण शहरातील देऊळवाडा – आडवण येथे श्री देवी सातेरी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक असलेल्या झाडाच्या फांद्या या वीज वाहिन्यांवर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी धोकादायक ठरणाऱ्या त्या फांद्यांची छाटणी करूनसंभावित धोका टाळल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे मालवण शहरातील देऊळवाडा – आडवण येथे श्री देवी सातेरी मंदिराकडे जाणाऱ्या…

Read More

कोळंब मार्गावरील डंपर वाहतूक कमी न झाल्यास आंदोलन छेडू

ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा इशारा ⚡मालवण ता.०७-: कोळंब-आचरा मार्गावरून वाळूने भरलेले डंपर भरधाव वेगात जात असल्याने अपघाताची भीती आहे. या मार्गावर डंपर व इतर गाड्यांच्या वेग नियंत्रणाकरिता स्पीडब्रेकर किंवा इतर सुविधा कराव्यात. कोळंब पुलावरून व कोळंब मार्गावरून होणारी डंपरची वाहतूक कमी करण्यासाठी आठ दिवसांत योग्य कार्यवाही न झाल्यास कोळंब ग्रामपंचायत व ग्रामस्थ कुठल्याही वेळी ग्रामपंचायतीसमोर रास्ता…

Read More

मालवण तालुका युवतीसेना रोशनी शिंदे यांच्या पाठीशी- सौ. निनाक्षी शिंदे-मेतर

⚡मालवण ता.०७-: ठाणे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवतीसेना पदाधिकारी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात पोलिसांकडून योग्य ती कारवाई होताना दिसत नाही. रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात पोलीस भाजप- शिंदे सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहेत काय ? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणात मालवण तालुका युवतीसेना रोशनी शिंदे यांच्या पाठीशी ठाम उभी आहे, असे युवतीसेना मालवण…

Read More
You cannot copy content of this page