रेवतळे येथील तरुण बेपत्ता

⚡मालवण ता.०७-: मालवण रेवतळे येथील सुनील महादेव खरात (वय ३०) हा तरुण दि. ४ एप्रिल पासून बेपत्ता असल्याची खबर त्याची आई पार्वती महादेव खरात यांनी मालवण पोलीस स्थानाकात दिली आहे.

पार्वती खरात यांनी पोलिसात दिलेल्या खबरी नुसार दि. ४ एप्रिल रोजी रात्री सुनील खरात हा कोणालाही न सांगता निघून गेला. त्याचा शोध घेतला मात्र, अद्यापपर्यंत तो घरी आलेला नाही. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकाँस्टेबल विलास टेंबूलकर हे अधिक तपास करत आहेत.

You cannot copy content of this page