मालवण तालुका युवतीसेना रोशनी शिंदे यांच्या पाठीशी- सौ. निनाक्षी शिंदे-मेतर

⚡मालवण ता.०७-: ठाणे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवतीसेना पदाधिकारी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात पोलिसांकडून योग्य ती कारवाई होताना दिसत नाही. रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात पोलीस भाजप- शिंदे सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहेत काय ? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणात मालवण तालुका युवतीसेना रोशनी शिंदे यांच्या पाठीशी ठाम उभी आहे, असे युवतीसेना मालवण तालुकाप्रमुख सौ. निनाक्षी शिंदे- मेतर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

ठाणे येथे शिवसेनेच्या (शिंदे गट) महिलांकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवतीसेना पदाधिकारी यांना मारहाण झाल्याचा आरोप झाल्यावर ठाकरे गट आक्रमक बनला आहे. या घटनेच्या निषेधार्थ युवती सेनेतर्फे मुंबईत मोर्चाही काढण्यात आला. याबाबत युवतीसेना मालवण तालुकाप्रमुख सौ. निनाक्षी शिंदे- मेतर यांनीही या घटनेविरोधात निषेध व्यक्त केला आहे. सध्याच्या राज्य सरकारच्या काळात महिला असुरक्षित बनल्या आहेत. रोशनी शिंदे मारहाणीचा आम्ही निषेध करत असून रोशनी शिंदे यांना न्याय न मिळाल्यास युवती सेना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल, असा इशाराही सौ.निनाक्षी शिंदे – मेतर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page