आम.नितेश राणे यांचा टोला; धमकी आल्याची केवळ नौटंकी
⚡कणकवली ता.०७-: संजय राऊत यांना कोणतीही धमकी बिस्नोई गॅंगकडून आलेले नाही असे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे .मच्छरला मारण्यासाठी मोठे गँगस्टर लागत नाहीत.असा टोला आम.नितेश राणे यांनी लगावताना उद्धव ठाकरे ,आदित्य ठाकरे, संजय राऊत हे डरपोक आहेत यांचे पोलीस संरक्षण काढून घ्या मग हे लोक बाहेर पडणार नाहीत असे आम.नितेश राणे म्हणाले.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे बोलत होते.
आम.नितेश राणे म्हणाले,संजय राऊत यांनी आपणाला बिस्नोई गँगकडून एसएमएस आला असून आम्ही तुम्हाला मारून टाकणार असे सांगून महाराष्ट्रात ब्रेकिंग न्यूज पसरविली आहे.मात्र मला मिळालेल्या माहितीनुसार संबंधित झोनचे डीएसपी यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांना अशा प्रकारची कोणती धमकी बिस्नोई गॅंगकडून आलेले नाही असे स्पष्ट केले आहे. बिस्नोई गॅंगने सलमान खानला धमकी दिली आहे मुसावला नावाच्या व्यक्तीला मारले आहे याचाच आधार घेत संजय राऊत यांनी धमकीचे नाटक केले आहे. कानावर आलेल्या माहितीनुसार कोणीतरी व्यक्ती याने दारू पिऊन फोन लावला व एसएमएस पाठविला आणि संजय राऊत यांनी याचा फायदा उचलला. मी परत एकदा सांगतो की ,मच्छरला मारण्यासाठी मोठे गँगस्टर लागत नाहीत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे पोलीस संरक्षण घेऊन महाराष्ट्रात फिरतात .महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर या तिघांचे संरक्षण काढावे. संजय राऊत यांना एक मच्छर पण मारणार नाही. ते एवढे घाबरट आहेत की जेव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली तेव्हा सामना समोर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी चार तास बाथरूममध्ये स्वतःला लॉक करून घेऊन संजय राऊत बसले होते. जोपर्यंत उद्धव ठाकरे, राज ठाकरे तिथे आले नाहीत तोपर्यंत बाथरूमच्या बाहेर ते पडले नाहीत. यांना बॉडीगार्ड ,पोलीस संरक्षण का दिले आहेत? खोटेनाटे चित्र तयार करण्यात यासाठीच का ?असा सवाल करताना आमदार नितेश राणे म्हणाले, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी धमकीचे आरोप केले होते मात्र आजचे चित्र पाहिल्यावर पोलीस तपास पाहिल्यावर काय निष्पन्न झाले. त्यांना धमकीच आली नव्हती तर ही केवळ नवटंकी आणि तमाशा होता .आपले पोलीस संरक्षण वाढवून मिळावे यासाठी हा सर्व प्रकार असल्याचे सांगताना आमदार नितेश राणे म्हणाले, ज्या माणसाला मच्छर मारणार नाही ,कोण कानफटात मारणार नाही आणि आपला हात खराब करून घेणार नाही अशा या नामर्द लोकांना केवळ नोटंकी करायची आहे . त्यामुळे या लोकांचे पोलीस संरक्षण काढून घ्या मग हे लोक बाहेर पडणार नाहीत कारण उद्धव ठाकरे ,आदित्य ठाकरे, संजय राऊत हे डरपोक आहेत असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला.
