वीज खांबांना धोकादायक ठरणाऱ्या फांद्या तोडल्याने नागरिकांमध्ये समाधान

⚡मालवण ता.०७-: मालवण शहरातील देऊळवाडा – आडवण येथे श्री देवी सातेरी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक असलेल्या झाडाच्या फांद्या या वीज वाहिन्यांवर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी धोकादायक ठरणाऱ्या त्या फांद्यांची छाटणी करून
संभावित धोका टाळल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे

मालवण शहरातील देऊळवाडा – आडवण येथे श्री देवी सातेरी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर RM.१६ या क्रमांकाच्या वीज पोलावर बाजूच्या एका झाडाची फांदी धोकादायक स्थितीत आल्याने ती पोलावर कोसळल्यास अनर्थ घडण्याची भीती होती. त्यामुळे याबाबत स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचे लक्ष वेधले असता पाटकर यांनी तातडीने स्व:खर्चाने धोकादायक फांदी तोडून घेतल्याने संभाव्य धोका टळला आहे.

याबाबत स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत दीपक पाटकर यांचे आभार मानले. यावेळी जितू पाटकर, बाळा आचरेकर, पिंटू गोलतकर, सुरज कदम, जयवंत वीर, अशोक मराळ, अरविंद मराळ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page