Headlines

आगामी निवडणुकीमध्ये युतीला शत प्रतिशत यश मिळेल…

विक्रांत पाटील, २०२४ पर्यत विरोध नावाला नसणार सावंतवाडीकोकणातील जनतेने यापुर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर विश्वास टाकला होता मात्र त्यांचा भ्रमनिरास झाल्याने आता जनतेच्या अपेक्षा शिंदे भाजप सरकारकडे वळल्याचे चित्र दिसून आले आहे त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये युतीला शत प्रतिशत यश मिळेल असा विश्वास भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी व्यक्त केला.

Read More

वयोवृद्ध रमेश यादव यांचे निधन

मालवण दि प्रतिनिधी माळगाव बागायत येथील रहिवासी रमेश कृष्णा यादव (आगलावे) (७०) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजयी, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी शशिकांत यादव यांचे ते बंधू तर गवंडी कारागीर नंदकिशोर यादव, योगेश यादव यांचे ते काका होत.

Read More

वाफोलीत शॉर्टसर्किटने ट्रान्सफॉर्मर जळून भस्मसात

⚡बांदा ता.१२-: वाफोली देऊळवाडी येथे आज दुपारी शॉर्टसर्किट होऊन ट्रान्सफॉर्मर जळून भस्मसात झाला. ट्रान्सफॉर्मरच्या सभोवताली गवत असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. स्थानिक नागरिकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागण्याची दोन महिन्यातील दुसरी वेळ आहे. महावितरणच्या हलगर्जी कारभाराबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहेत.       भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी महावितरण अधिकाऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना…

Read More

केंद्र, राज्य शासनाच्या योजना तळागाळात पोहोचवा

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे आवाहन वेंगुर्लेकेंद्र व राज्य शासनामार्फत आज विविध योजना राबविल्या जात असून तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी यांनी ग्रामपंचायत स्तरावर योजनांचा अभ्यास करून राज्य व केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवाव्यात. तरच सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वेंगुर्ले येथे केले.भाजपाच्या महाविजय २०२४ जनसंपर्क अभियान अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा…

Read More

कृष्णराव केळुसकर यांच्या ग्रंथसंपदाचे होणार पुन्हा प्रकाशन

नाईक मराठा मंडळाचा उपक्रम:१४ रोजी कुडाळ येथे कार्यक्रम ओरोस ता.१२-: देशाचे घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरुवर्य तथा अपेक्षित सन्मानापासून अपेक्षित राहिलेले महान साहित्यिक कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या ग्रंथसंपदाचे पुनर्प्रकाशन १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता कुडाळ येथील गुलमोहर हॉटेल येथील श्री महालक्ष्मी हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे. कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे माजी मराठी विभाग…

Read More

निवासी उपजिल्हाधिकारी पदी मच्छिंद्र सुकटे यांची नियुक्ती

कुडाळ प्रांताधिकारी पदी ऐश्वर्या काळूशे यांची नियुक्ती;जिल्हा पुरवठा अधिकारी गीते यांची झाली बदली ओरोस ता.१२-:सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रिक्त असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर मच्छिंद्र सुकटे यांची आणि कुडाळ प्रांताधिकारी या पदावर ऐश्वर्या काळूशे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. तर जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांची पुणे येथील अन्न धान्य वितरण अधिकारी या पदावर बदली करण्यात आली…

Read More

नवीन शैक्षणिक धोरणाबाबत शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टता करावी

अन्यथा विद्यार्थ्यांचे नुकसान होईल;काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांचे आवाहन ⚡वेंगुर्ला ता.१२-: येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणमंत्र्यांनी नविन शैक्षणिक धोरण लागू करणार असल्याचे सांगितले आहे. परंतु, याची प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी करणार याबद्दल संस्था चालक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या मनामध्ये निर्माण झालेला संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करावा अन्यथा काहीतरी करुन दाखविण्याच्या नादात विद्यार्थ्यांचे…

Read More

वार्षिक करवसुलीचे उद्दिष्ट तब्बल 104 टक्के पूर्ण

कणकवली तहसिलदार आर. जे.पवार यांचा सत्कार ⚡कणकवली ता.१२-: प्रशासनाने ठरवून दिलेले वार्षिक करवसुलीचे उद्दिष्ट तब्बल 104 टक्के पूर्ण केल्याबद्दल कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांचा कणकवली तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी मंडळ अधिकारी दिलीप पाटील, मंडळ अधिकारी, संतोष , नागावकर, मंडळ अधिकारी मेघनाथ पाटील, मंडळ अधिकारी विलास चव्हाण, मंडळ अधिकारी नीलिमा प्रभुदेसाई, अव्वल…

Read More

हातिवलेतील टोलनाका पुन्हा सुरु झाल्याने निलेश राणेंची स्टंटबाजी उघड…

संदेश पारकर;सिंधुदुर्गातील टोलनाका सुरू करायला देणार नाही ⚡कणकवली ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी मिळाल्याशिवाय सिंधुदुर्गातील टोल नाका शिवसेना सुरू करायला देणार नाही असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला आहे. राजापूर तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील हातीवले टोलनाका डिसेंबर मध्ये सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी निलेश राणे यांनी ग्रामस्थांसमोर आंदोलनाची स्टंटबाजी करून हातीवले टोलनाका…

Read More

काजूला किमान १५० रु. हमीभाव मिळावा

राष्ट्रवादी च्या कोंकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे-परब यांची विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.१२-: दोडामार्ग – वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघासह तळकोकणातील शेतकऱ्यांना काजू बी साठी राज्यशासनाने १५० रू प्रति किलो हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी आज विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी कोकण विभागीय अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी निवेदनाद्वारे केली….

Read More
You cannot copy content of this page