केंद्र, राज्य शासनाच्या योजना तळागाळात पोहोचवा

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे आवाहन

वेंगुर्ले
केंद्र व राज्य शासनामार्फत आज विविध योजना राबविल्या जात असून तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी यांनी ग्रामपंचायत स्तरावर योजनांचा अभ्यास करून राज्य व केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवाव्यात. तरच सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वेंगुर्ले येथे केले.
भाजपाच्या महाविजय २०२४ जनसंपर्क अभियान अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा पं.स. मतदारसंघ व वेंगुर्ले शहराचा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बुधवारी साई मंगल कार्यालय येथे लाभार्थी मेळावा संपन्न झाला.यावेळी
आयुष्यमान भारत योजना, सुकन्या समृद्धी योजना, ई श्रम कार्ड योजना च्या 200 लाभार्थीना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत कार्ड वाटप चा शुभारंभ करण्यात आला. व्यासपीठावर जिल्हा कार्यकारिणी सचिव शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक, तालुका सरचिटणीस बाबली वायगणकर, सोमनाथ टोमके, माजी उपनगराध्यक्ष शीतल आंगचेकर, सुषमा प्रभुखानोलकर, सुरेंद्र चव्हाण, पूनम जाधव, वसंत तांडेल आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तेली म्हणाले, विविध योजना केंद्र सरकार मार्फत राबविल्या जात आहेत. शेतकरी सन्मान योजनेत सहा हजार रुपये मिळत आहेत.राज्य सरकार कडून आता त्यात वाढ करण्यात आली असून एकूण बारा हजार रुपये मिळणार आहेत.महिलांना एस टी मध्ये 50 टक्के सवलत, गोपीनाथ मुंडे अपघात योजना यासह अन्य योजना आहेत.त्यांचा अभ्यास करा व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवा. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या जिल्ह्यासाठी भरपूर निधी दिला आहे.तसेच त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रिपद असल्याने त्याचा येथिल विकासासाठी फायदा होणार आहे.त्यासाठी आवश्यक रस्ते विकासकामांची यादी बनवा व ती राज्यस्तरापर्यंत् मंत्री चव्हाण यांच्याकडे द्या, असेही तेलि म्हणाले.यावेळी प्रसन्ना देसाई यांनी हे जनसंपर्क अभियान तालुक्यात प्रभाविपणे राबविले जात असून भारतीय जनता पार्टी च्या सर्व कार्यकर्त्यांनी सरल एप डाउनलोड करावे व त्यामध्ये आपली परिपूर्ण माहिती भरावी,असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्ना देसाई यांनी केले.यावेळी
उभादांडा, परबवाडा व वेंगुर्ले शहरातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

फोटो : वेंगुर्ले येथे आयोजित मेळाव्यात विविध योजनांच्या मोफत कार्ड वाटपचा शुभारंभ करताना राजन तेली, सोबत शरद चव्हाण, सुहास गवंडळकर, प्रसन्ना देसाई व अन्य

You cannot copy content of this page