वाफोलीत शॉर्टसर्किटने ट्रान्सफॉर्मर जळून भस्मसात

⚡बांदा ता.१२-: वाफोली देऊळवाडी येथे आज दुपारी शॉर्टसर्किट होऊन ट्रान्सफॉर्मर जळून भस्मसात झाला. ट्रान्सफॉर्मरच्या सभोवताली गवत असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. स्थानिक नागरिकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागण्याची दोन महिन्यातील दुसरी वेळ आहे. महावितरणच्या हलगर्जी कारभाराबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहेत.
       भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी महावितरण अधिकाऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना करणे अपेक्षित असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page